Next

पर्यटकांच्या गर्दीत कोल्हापूर फ्लॉवर फेस्टिव्हलची सांगता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 09:08 PM2017-12-29T21:08:42+5:302017-12-29T21:08:59+5:30

कोल्हापूर : अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरात आलेला भाविक किंवा पर्यटक येथे चार दिवस राहिला पाहिजे यासाठी जगभरातले सौंदर्य कोल्हापुरात आणण्याची आमची तयारी आहे. काही क्षणांसाठी हवेतली कल्पना वाटलेल्या ‘फ्लॉवर फेस्टिव्हल’ची यशस्विता हे त्याचे द्योतक आहे. शहराच्या पर्यटन वृद्धीसाठी आणि सौंदर्यीकरणासाठी तुम्ही नव्या कल्पना मांडा; त्या प्रत्यक्ष व्यवहारात उतरविण्याचे सामर्थ्य शासनाकडे आणि माझ्याकडे आहे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. कोल्हापूर रस्ते विकास सौंदर्यीकरण प्रकल्प (केएसबीपी)च्या वतीने पोलीस उद्यानात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या ‘कोल्हापूर फ्लॉवर फेस्टिव्हल’ची सांगता  झाली.  यावेळी फ्लॉवर फेस्टिव्हलचे सौंदर्य व माहिती विशद करणा-या ‘फुलोत्सव’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.