लाइव न्यूज़
 • 11:00 AM

  #Tennis अंकिता रैनाने महिला एकेरीत बाद फेरीत प्रवेश केला. तिने इंडोनेशियाच्या गुमुल्या बेट्रीसवर 6-2, 6-4 असा विजय मिळवला.

 • 10:57 AM

  #Shooting भारतीय नेमबाज अपूर्वी चंडेलाने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. एलावेनील वालारीवनला 14व्या स्थानावर समाधान मानावे लागले.

 • 10:27 AM

  #Badminton सायना नेहवालचे कमबॅक, पण भारत 1-2 पिछाडीवर. जपानच्या नोझोमी ओकुहाराचे कडवे आव्हान मोडून काढताना सायनाने स्पर्धेतील आव्हान जीवंत राखण्याचे प्रयत्न केले, परंतु ओकुहाराने 21-11, 25-23, 21-16 असा विजय मिळवला.

 • 10:18 AM

  #Rowing पुरूष संघाने 6.15.18 सेंकदाच्या वेळेसह अंतिम फेरीत प्रवेश केला.

 • 10:16 AM

  तिरुअनंतपूरम- जेजे रुग्णालयाचे 55 डॉक्टर्स, ससून रुग्णालयातील 26 डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, गिरीश महाजन आणि दोन एअर इंडियाची विमानं केरळमध्ये बचावकार्य राबवण्यासाठी रवाना

 • 10:10 AM

  मुंबईः शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स 38,170.07, निफ्टी 11,527.80वर

 • 10:07 AM

  भारताच्या दुष्यंतने रोईंगमध्ये पुरूषांच्या लाईटवेट सिंगल स्कल प्रकाराच्या अंतिम फेरीचे तिकीट पटकावले

 • 10:06 AM

  सापेकटक्रावमध्ये भारताने विजयाने प्रारंभ केला. भारतीय संघाने सलामीच्या सामन्यात इराणवर 21-16, 19-21, 21-17 असा विजय मिळवला.

 • 10:06 AM

  नेमबाज दीपक कुमारला रौप्यपदक, भारताच्या खात्यात आणखी एक पदक

 • 10:04 AM

  भारताच्या महिला संघाने अ गटात चुरशीच्या लढतीत थायलंडवर 33-23 असा विजय मिळवला

 • 09:42 AM

  नवी दिल्ली : उमर खालिद हल्ला प्रकरण, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं दोन जणांना घेतलं ताब्यात.

 • 09:27 AM

  झारखंड- नदीमध्ये पाच जण बुडाले, दोघांना वाचवण्यात यश, तिघांचा शोध सुरू

 • 09:07 AM

  गडचिरोली- मुसळधार पावसानं भामरागडमध्ये 130 गावांचा संपर्क तुटला

 • 08:58 AM

  8 दिवसांनंतर कोचीवरून व्यावसायिक उड्डाणे सुरू, नौदलाच्या तळावरून वाहतूक

 • 08:31 AM

  नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, राहुल गांधी, गुलाम नबी आझाद आणि अशोक गहलोत यांनी माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जन्मदिनानिमित्त श्रद्धांजली वाहिली.

All post in लाइव न्यूज़

जळगाव अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या