Next

फाईव्ह अ साईड हॉकीमुळे शालेय मुला-मुलींना हॉकीचा आनंद लुटता येणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2017 06:31 AM2017-11-19T06:31:00+5:302017-11-19T06:43:04+5:30

पुणे : राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्याचा आमचा उद्देश असा आहे की, महाराष्ट्रातून जास्तीत जास्त हॉकीचे खेळाडू (मुले-मुली) ...

पुणे : राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्याचा आमचा उद्देश असा आहे की, महाराष्ट्रातून जास्तीत जास्त हॉकीचे खेळाडू (मुले-मुली) तयार व्हावीत आणि त्यांनी भारतीय संघाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व करावे. फाईव्ह अ साईड हॉकीमुळे शालेय मुला-मुलींना हॉकीचा आनंद नक्कीच लुटता येणार आहे, असे हॉकी महाराष्ट्राचे अध्यक्ष हितेश जैन यांनी सांगितले. तसचे, औरंगाबादमध्ये आम्ही घेतलेल्या बैठकीमध्ये काही निर्णयसुद्धा घेतले आहेत की ज्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये हॉकीची मैदाने तयार होतील. लेटस ब्रिंग बॅक द ओल्ड ग्लोरी हे आम्ही महाराष्ट्राचे ब्रीद वाक्य केले आहे, असेही हितेश जैन म्हणाले.   

टॅग्स :हॉकीHockey