Next

वडाळा रेल्वे स्थानकात बेवारस बॅग सापडल्याने भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 06:46 PM2019-03-14T18:46:18+5:302019-03-14T18:46:56+5:30

तात्काळ रेल्वे सुरक्षा दलाने बॉम्ब शोधक आणि नाशक पथक आणि श्वान पथक परिसरात दाखल करून बेवारस बॅगेची तपासणी केली.

वडाळा रेल्वे स्थानक परिसरात आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास एका छताच्या खांबाखाली एक बेवारस बॅग आढळून आली. त्यामुळे रेल्वे स्थानकात खळबळ मजली तसेच प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.