काटा येथेही जुगारावर धाड; तिघांवर गुन्हा दाखल

By admin | Published: May 11, 2017 06:52 AM2017-05-11T06:52:38+5:302017-05-11T06:52:38+5:30

वाशिम तालुक्यातील काटा येथील झोपडपट्टी परिसरात ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळताना पोलिसांनी तिघांना अटक केली.

Yacht raid on Kata; Filed three trials | काटा येथेही जुगारावर धाड; तिघांवर गुन्हा दाखल

काटा येथेही जुगारावर धाड; तिघांवर गुन्हा दाखल

Next

वाशिम: तालुक्यातील काटा येथील झोपडपट्टी परिसरात ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळताना पोलिसांनी तिघांना अटक केली. या प्रकरणी वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये १० मे रोजी मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. काटा (ता.जि.वाशिम) येथील झोपडपट्टी परिसरात जुगार सुरू असल्याची माहिती ठाणेदार सुनील अंबुलकर यांना मिळाली. त्याआधारे बीट जमादार वसंत तहकिक, नप्ते, शैलेश ठाकूर व दिलीप देवकते यांच्या पथकाने जुगारावर छापा टाकला. या छाप्यामध्ये रमेश गोविंदा कांबळे, अरूण नागोराव चव्हाण व जनार्दन रामचंद्र कांबळे या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ५२ ताश पत्ते व रोख ११२० रूपये जप्त केले. या घटनेचा अधिक तपास बिट जमादार तहकिक करीत आहेत.

Web Title: Yacht raid on Kata; Filed three trials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.