जानेवारीमध्ये होणार वाशिम जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतीक स्पर्धा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 09:50 PM2017-12-03T21:50:49+5:302017-12-03T21:56:58+5:30

जिल्हा परिषदेतर्फे जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा ५ ते ७ जानेवारी २०१८ दरम्यान जिल्हा क्रीडा संकुलावर आयोजित करण्यात आल्या आहेत. क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टिने विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.

Wisham Zilla Parishad's Sports and Cultural Competition to be held in January! | जानेवारीमध्ये होणार वाशिम जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतीक स्पर्धा!

जानेवारीमध्ये होणार वाशिम जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतीक स्पर्धा!

googlenewsNext
ठळक मुद्दे५ ते ७ जानेवारी दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजनउपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्या गठित

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - जिल्हा परिषदेतर्फे जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा -२०१७-१८ चे आयोजन ५ ते ७ जानेवारी २०१८ दरम्यान स्थानिक जिल्हा क्रीडा संकुलावर करण्यात आले आहे. क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टिने विविध समित्या गठीत केल्या असून, आता पूर्वनियोजनला सुरूवात करण्यात आली.
शासकीय कामकाज पार पाडत असतानाच, अधिकारी व कर्मचा-यांच्या कलागुणांना वाव मिळावा, सादरीकरणासाठी व्यासपिठ उपलब्ध व्हावे, थोडाफार विरंगूळा मिळावा या उद्देशाने जिल्हा परिषदेच्यावतीने ५ ते ७ जानेवारी २०१८ या दरम्यान अधिकारी व कर्मचा-यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा वाशिम येथील जिल्हा क्रीडा संकुलावर आयोजित केल्या आहेत.  या स्पर्धेच्या जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील तर सचिव म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) प्रमोद कापडे यांची एकमुखाने निवड करण्यात आल्यानंतर विविध समित्या कठीत करण्यात आल्या. तालुकास्तरावरदेखील गटविकास अधिका-यांकडे समिती अध्यक्षाची जबाबदारी सोपवून सचिव पदी गटशिक्षणाधिका-यांची निवड करण्यात आली.  तालुकास्तरावर १६ डिसेंबरपूर्वी दरवर्षीप्रमाणे सर्व खेळाडूंची आवश्यकतेनुसार चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर योग्य खेळाडूंची निवड करावयाची आहे. निवड करण्यात आलेल्या खेळाडूंची यादी २२ डिसेंबर २०१७ पर्यंत जिल्हा परिषदेकडे सादर करावयाची आहे. खेळप्रकारनिहाय खेळाडूंची यादी प्राप्त झाल्यानंतर त्या अनुषंगाने जिल्हास्तरावर नियोजन केले जाणार आहे. जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेतून यशस्वी ठरलेल्या खेळाडूंची निवड विभागीय स्पर्धेसाठी होणार आहे. अद्याप विभागीय स्पर्धेची तारीख निश्चित झाली नसून, लवकरच विभागीय आयुक्त ही तारीख जाहिर करतील, अशी अपेक्षा जिल्हा परिषद कर्मचारी संघटना बाळगून आहेत. जिल्हास्तरीय स्पर्धेच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी बैठक घेऊन अधिकारी व कर्मचाºयांना योग्य त्या सूचना दिल्या.
 

Web Title: Wisham Zilla Parishad's Sports and Cultural Competition to be held in January!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.