पंजाब ते नांदेड प्रवास करणाऱ्या सायकलस्वारांचे वाशिम येथे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 05:51 PM2018-02-20T17:51:06+5:302018-02-20T17:53:11+5:30

वाशिम - पंजाब राज्यातील लुधियाना येथून मराठवाड्यातील नांदेड येथे गुरु गोविंदसिंग समाधीच्या दर्शनासाठी सायकलने जाणाऱ्या सायकलस्वारांचे वाशिम नगरीत १९ फेब्रुवारीला सायंकाळी आगमन झाले.

Welcome at Washim cyclist from Punjab to Nanded | पंजाब ते नांदेड प्रवास करणाऱ्या सायकलस्वारांचे वाशिम येथे स्वागत

पंजाब ते नांदेड प्रवास करणाऱ्या सायकलस्वारांचे वाशिम येथे स्वागत

Next
ठळक मुद्देपंजाब राज्यातील लुधियाना येथील १२ सायकलस्वार ५ फेबु्रवारी रोजी नांदेडसाठी रवाना झाले होते. हे १२ सायकलस्वार सोमवार १९ फेबु्रवारी रोजी सायंकाळी वाशिम शहरात दाखल झाले.यावेळी मारवाडी युवा मंचच्यावतीने या सर्व सायकलस्वारांचे स्वागत करण्यात आले.

वाशिम - पंजाब राज्यातील लुधियाना येथून मराठवाड्यातील नांदेड येथे गुरु गोविंदसिंग समाधीच्या दर्शनासाठी सायकलने जाणाऱ्या सायकलस्वारांचे वाशिम नगरीत १९ फेब्रुवारीला सायंकाळी आगमन झाले. यावेळी मारवाडी युवा मंचच्यावतीने या सर्व सायकलस्वारांचे स्वागत करण्यात आले.

पंजाब राज्यातील लुधियाना येथील १२ सायकलस्वार ५ फेबु्रवारी रोजी नांदेडसाठी रवाना झाले होते. हे १२ सायकलस्वार सोमवार १९ फेबु्रवारी रोजी सायंकाळी वाशिम शहरात दाखल होत असल्याची माहिती नारायण व्यास यांना मिळाल्यानंतर त्यांनी या सायकलस्वारांचे स्वागत करण्याचा निर्णय घेतला आणि याबाबत त्यांनी मारवाडी युवा मंचच्या पदाधिकाºयांना याबाबत माहिती दिली. मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष मनिष मंत्री यांनी सायकल स्वार ग्रुपचे श्रीनिवास व्यास, चेतन शर्मा, आदेश कहाते,  दिपक एकाडे, पवन शर्मा, इत्यादी पदाधिकाºयांच्या समवेत पंजाब येथून नांदेडकडे प्रस्थान करणाºया सर्व सायकल स्वारांचे स्वागत केले. 

Web Title: Welcome at Washim cyclist from Punjab to Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.