'बम भोले’च्या गजरात शेलूबाजार येथे कावड यात्रेचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 04:10 PM2018-08-20T16:10:23+5:302018-08-20T16:11:29+5:30

शेलूबाजार (वाशिम) : श्रावण मासानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही येथील शिवाजी नगर शिवभक्त कावड मंडळाच्या वतीने श्रीक्षेत्र वाघागड येथील गजानन महाराज गुप्तेश्वर संस्थान येथून जल आणण्यासाठी कावड रवाना झाली होती.

Welcome to the Kavad Yatra at shelu bazar | 'बम भोले’च्या गजरात शेलूबाजार येथे कावड यात्रेचे स्वागत

'बम भोले’च्या गजरात शेलूबाजार येथे कावड यात्रेचे स्वागत

googlenewsNext
ठळक मुद्दे२० आॅगस्ट रोजी या कावड यात्रेचे गावात आगमन झाले. ‘बम भोले’च्या गजरात गावातून शिवभक्तांची मिरवणूक काढून ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क
शेलूबाजार (वाशिम) : श्रावण मासानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही येथील शिवाजी नगर शिवभक्त कावड मंडळाच्या वतीने श्रीक्षेत्र वाघागड येथील गजानन महाराज गुप्तेश्वर संस्थान येथून जल आणण्यासाठी कावड रवाना झाली होती. तेथून २० आॅगस्ट रोजी या कावड यात्रेचे गावात आगमन झाले. त्यानिमित्त ‘बम भोले’च्या गजरात गावातून शिवभक्तांची मिरवणूक काढून ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.
कावड यात्रेचे गावात आगमन होताच मुख्य चौकात गावातील युवकांनी आतषबाजी करित शिवशंकराच्या गितांवर थिरकत मोठा जल्लोष केला. शिवभक्तांनी जल भरून आणलेल्या कावडीची गावातून  मिरवणूक काढण्यात आली. यामुळे संपूर्ण गाव शिवभक्तीमय झाल्याचे दिसून येत होते. यावेळी पांडूरंग कोठाळे, पंचायत समितीचे माजी उपसभापती विलास लांभाडे यांच्यासह गावातील शेकडो शिवभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Web Title: Welcome to the Kavad Yatra at shelu bazar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.