सावरगाव फॉरेस्ट येथे पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 03:35 PM2019-01-14T15:35:14+5:302019-01-14T15:35:30+5:30

तळप बु. : गट ग्रामपंचायतअंतर्गत सावरगाव येथे ग्रामपंचायत विहीरीला पाणी नसल्यामुळे ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे

Water scarcity at Sawargaon forest | सावरगाव फॉरेस्ट येथे पाणी टंचाई

सावरगाव फॉरेस्ट येथे पाणी टंचाई

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
तळप बु. : गट ग्रामपंचायतअंतर्गत सावरगाव येथे ग्रामपंचायत विहीरीला पाणी नसल्यामुळे ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. हा त्रास वाचविण्यासाठी विहिर अधिग्रहण करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून केल्या जात आहे. 
सावरगाव फॉरेस्ट येथे ग्रामपंचायत विहीर,  सार्वजनिक विहिर,  खाजगी विहीरीला पाणी नसल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे स्थानिक नागरिकांना दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागते, मात्र येथे कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात येत नाही. मागील वर्षीही १ जानेवारीपासून विहीर अधिग्रहण करण्यात आली होती. याहीवर्षी ग्रामपंचायतने विहीर अधिग्रहनाकरिता प्रस्ताव दिल्याची माहिती आहे , परंतु अद्याप विहीर अधिग्रहन होवू पाणीटंचाई दूर करण्यात आली नाही.  त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. तरी लवकरातत लवकर विहीर अधिग्रहण करून पाणीटंचाई दूर करावी अशी मागणी सावरगाव येथील नागरिकांकडून होत आहे. 

 


सावरगाव येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी ग्राम पंचायतने विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव दिला आहे. विहीर अधिग्रहन आल्यांनतर पाणीटंचाई दूर होईल. 
-भगवान राठोड ,उपसरपंच

Web Title: Water scarcity at Sawargaon forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.