‘ऑनलाइन मोड्युल’ ठेवणार कृषी सेवा केंद्रांवर ‘वॉच’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 01:48 AM2017-10-25T01:48:37+5:302017-10-25T01:49:18+5:30

वाशिम: कृषी सेवा केंद्रांच्या कारभाराची इत्थंभूत दैनंदिन माहिती सहज उपलब्ध व्हावी आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे शक्य व्हावे म्हणून ‘ऑनलाइन मोड्ययुल’ विकसित करण्याचे काम कृषी विभागाने सुरू केले आहे. कृषी विकास अधिकार्‍यांनी ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे, येत्या काही दिवसांतच हे ऑनलाइन मोड्युल वापरात येणार आहे. 

'Watch' at the Agricultural Services Centers to Keep 'Online Modules' | ‘ऑनलाइन मोड्युल’ ठेवणार कृषी सेवा केंद्रांवर ‘वॉच’!

‘ऑनलाइन मोड्युल’ ठेवणार कृषी सेवा केंद्रांवर ‘वॉच’!

googlenewsNext
ठळक मुद्देकृषी विकास अधिकार्‍यांची योजना स्मार्ट फोनवरून माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: कृषी सेवा केंद्रांच्या कारभाराची इत्थंभूत दैनंदिन माहिती सहज उपलब्ध व्हावी आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे शक्य व्हावे म्हणून ‘ऑनलाइन मोड्ययुल’ विकसित करण्याचे काम कृषी विभागाने सुरू केले आहे. कृषी विकास अधिकार्‍यांनी ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे, येत्या काही दिवसांतच हे ऑनलाइन मोड्युल वापरात येणार आहे. 
मागील काही दिवसांत कीटकनाशकांची फवारणी करताना शेकडो शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. यामुळे राज्यभरात खळबळ माजली आणि शासनाने त्याची दखल घेतली. वाशिम जिल्ह्यात जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने पूर्वीच जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी क रण्याचा निर्णयही घेतला. दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यात घडलेल्या दुर्घटनांचा पृष्ठभूमीवर कृषी सेवा केंद्रांच्या व्यवहारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. त्यामुळे कृषी सेवा केंद्रांचे रेकॉर्ड नियमित आणि अचूकतेने तपासण्याची गरज निर्माण झाली. त्यामुळे कृषी सेवा केंद्रांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक पद्धतीचा अवलंब करण्याची कल्पना जिल्हा कृषी विकास अधिकार्‍यांना सुचली. या कल्पनेतूनच त्यांनी कृषी सेवा केंद्रधारकांची अद्ययावत माहिती घेण्यासाठी ‘ऑनलाइन मोड्युल’ तयार करण्याचा निर्णय घेतला. मोबाइल अँपच्या धर्तीवर हे मोड्युल तयार करण्यात येत असून, यासाठी एनआयसीच्या तंत्रज्ञांचा आधार ते घेत आहेत.   कृषी सेवा केंद्रधारकांना या मोड्युलचा वापर करण्यासाठी व्हॉट्स अँपप्रमाणे ते डाउनलोड करून नोंदणी करताना प्रतिष्ठानासह स्वत:ची संपूर्ण माहिती भरावी लागणार आहे. एकदा हे मोड्युल डाउनलोड झाले की, त्यामध्ये कृषी सेवा केंद्रांनी दिवसाला केलेल्या व्यवहाराची माहिती भरावी लागेल. कृषी सेवा केंद्रांनी एका दिवशी कोणत्या कंपनीचे, कोणते बियाणे, कोणते वाण आणि किती विकले याची इत्थंभूत माहिती त्यात नमूद असेल. या मोड्युलचे दुय्यम स्तरावरील नियंत्रण तालुका कृषी अधिकारी, तत्सम कृषी अधिकार्‍यांकडे, तर अंतिम नियंत्रण हे कृषी विकास अधिकार्‍यांकडे असणार आहे. तालुका कृषी अधिकार्‍यांना त्यांच्या तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांचे रोजचे व्यवहार आरामात तपासता येतील, तर जिल्हा कृषी विकास अधिकार्‍यांना संपूर्ण जिल्हाभरातील कृषी सेवा केंद्रांचे व्यवहार तपासता येणार आहेत. ही प्रणाली दिवसेंदिवस अद्ययावतही करण्यात येणार आहे. त्यामुळे कृषी सेवा केंद्राचा कागदी लेखाजोखा या मोड्युलमुळे खरा की, खोटा ते कळण्यास मोठी मदत होणार आहे. 

दरफलक ासह इतर माहितीसाठीही आधुनिक पर्याय 
जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांना माहिती फलक नमूद करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तथापि, शेकडो कंपन्यांच्या उत्पादनांची नावे, त्यांचे रोज बदलणारे दर आणि इतर माहिती दर दिवशी बदलणे कृषी सेवा केंद्रांना शक्य होणार नाही. त्यासाठीही एक पर्याय जिल्हा कृषी विकास अधिकार्‍यांनी सुचविला आहे. वेगवेगळय़ा उत्पादनांच्या जाहिरातीसाठी वापरण्यात येणार्‍या एलईडी स्क्रीन, तसेच रेल्वेस्टेशनवर प्रवाशांना गाड्यांची माहिती देणार्‍या स्क्रीन किंवा पंचतांकित उपाहागृहात ग्राहकांच्या माहितीसाठी लावण्यात येणार्‍या स्क्रीनच्या धर्तीवर एलईडी स्क्रीन दुकानांत लावून त्याची जोडणी दुकानाच्या संगणकाशी करून दुकानांत उपलब्ध असलेली उत्पादने, दर, कृषी अधिकार्‍यांचे संपर्क क्रमांक, कं पनीची नावे, त्या स्क्रीनवर दाखविण्याचा सल्ला कृषी सेवा कें द्रांना त्यांनी दिला. त्यांच्या या सूचनेला जिल्ह्यातील अनेक कृषी सेवा केंद्रधारकांचे सर्मथनही लाभले आहे. असा प्रयोग करणारा वाशिम हा राज्यातील पहिलाच जिल्हा ठरणार आहे.  

कृषी सेवा केंद्रांची रोजची माहिती तपासणे हे काम अशक्य नसले तरी, त्यामध्ये अडचणी येतात. हे काम सोपे व्हावे आणि त्यांच्यावर नियंत्रण असावे म्हणून ऑनलाइन मोड्युल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कृषी सेवा केंद्रधारकांना नोंदणी करून घ्यावी लागेल आणि त्यात रोजच्या व्यवहाराची माहिती भरावी लागेल. शेतकर्‍यांचा व्यवहार कागदोपत्री झाला तरी, ती माहिती या मोड्युलमध्ये नमूद होणार असल्याने आम्हाला वाटेल तेव्हा या मोड्युलच्या आधारे कृषी सेवा 
कें द्रांचा लेखाजोखा सहज तपासता येईल. प्राथमिक स्वरूपात जानेवारी महिन्यापासून हे मोड्युल वापरण्यास सुरुवात होईल. 
-नरेंद्र बारापत्रे
कृषी विकास अधिकारी

Web Title: 'Watch' at the Agricultural Services Centers to Keep 'Online Modules'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी