देवतलावासाठी वाशिमकरांना पुन्हा कळकळीची हाक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 01:47 PM2018-05-24T13:47:16+5:302018-05-24T13:47:16+5:30

वाशिम :  प्राचीन ऐतिहासक वाशिम (वत्सगुल्म) नगरीचे अराध्य दैवत श्री बालाजी संस्थानच्या पायथ्याशी असलेल्या देवतलावास गतवैभव प्राप्त व्हावे म्हणुन देवतलावाचे खोलीकरणासाठी वाशिम करांना पुन्हा कळकळीची हाक देण्यात येत आहे.

Washimkar again calls for cleaning of leck | देवतलावासाठी वाशिमकरांना पुन्हा कळकळीची हाक!

देवतलावासाठी वाशिमकरांना पुन्हा कळकळीची हाक!

Next
ठळक मुद्देदेवतलावातील घाण तसेच गाळ उपसण्याचे काम हाती घेण्यात आले. शहरातील सर्व समाजातील नागरिक व जनता आपले भेदभाव विसरुन तनमनधनाने पुढे सरसावले. देवतलाव पुर्नजीवनाचे कार्य पुर्णत्वास नेण्यासाठी वाशिमकर नागरिकांनी पुन्हा एकदा सढळ हाताने दानराशी देण्याची गरज आहे.

- शिखरचंद बागरेचा 

वाशिम :  प्राचीन ऐतिहासक वाशिम (वत्सगुल्म) नगरीचे अराध्य दैवत श्री बालाजी संस्थानच्या पायथ्याशी असलेल्या देवतलावास गतवैभव प्राप्त व्हावे म्हणुन देवतलावाचे खोलीकरणासाठी वाशिम करांना पुन्हा कळकळीची हाक देण्यात येत आहे.

शहराच्या मध्यभागी बालाजी मंदिराला लागुन असलेले देवतलाव मागील काही वर्षापासुन अनियमित पावसाअभावी सातत्याने कोरडे पडत आहेत. सदर तलाव कोरडे पडल्यामुळे सन १९७२ नंतर म्हणजेच तब्बल ४६ वर्षानंतर वाशिम शहराची पाणी पातळी अत्यंत खोलात गेली आहे. भिषण पाणी टंचाईमुळे वाशिमसह परिसरातील नागरिक तसेच पशुपक्षी व सर्व प्राणी मात्रांची पाण्यांसाठी वनवन भटकंती सुुरु आहे. भविष्यात पाणी टंचाइृचा सामना करण्याची वेळ नवीन पिढीवर येवु नये म्हणुन शहरातील समाजसेवी युवकांनी ‘मी वाशिमकर’ या गु्रपची स्थापना करण्यात आली व देवतलावातील घाण तसेच गाळ उपसण्याचे काम हाती घेण्यात आले. वाशिमकर ग्रुपचे परिश्रम व मेहनत पाहता शहरातील सर्व समाजातील नागरिक व जनता आपले भेदभाव विसरुन या ज्वलंत समस्येचे निराकरण करण्यासाठी तनमनधनाने पुढे सरसावले. शहरातील सर्व सामाजिक व स्वयंसेवी संस्था ,शासकीय व निमशासकीय संस्था व त्यांच्या कार्यकर्त्यांनी देवतलावात प्रत्यक्षरित्या मेहनत करुन देवतलावाचे गाळ उपसण्यासोबतच त्याचे खोलीकरण करण्यात यश मिळविले.या महत कार्याला सर्वसामाजिक संघटना ,समाजसेवी संस्था, शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटनासह इतर सर्वांनी परिश्रमासोबतच सढळ हाताने दानराशी देवुन आपला हातभार लावला आहे. या तलावाचे कार्य अंतीम टप्यात सुरु असुन देवतलाव पुर्नजीवनाचे कार्य पुर्णत्वास नेण्यासाठी वाशिमकर नागरिकांनी पुन्हा एकदा सढळ हाताने दानराशी देण्याची गरज आहे. वाशिमकरांच्या संयुक्त व एकत्रीकरणाने आगामी पावसाळ्यात देवतलाव तुडूंब भरुन पुढील शंभर वर्षात वाशिम नगरीत दुष्काळ परिस्थिती उदभवणार नाही यासाठी मी वाशिमकर ग्रुप अगदी तन्मयतेने परिश्रम घेत आहेत. देवतलावाचे सुरु असलेले कार्य पाहता वाशिमकर नागरिकांकडून या स्तुत्य कार्यक्रमाचे कौतुक व कुतुहल व्यक्त करीत आहेत.

Web Title: Washimkar again calls for cleaning of leck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम