वाशिम : मालेगाव-मेहकर मार्गावर ट्रक व बसची धडक; बसमधील १५ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 07:09 PM2018-02-15T19:09:57+5:302018-02-15T19:18:14+5:30

मालगाव - ट्रक व बसमध्ये अपघात होऊन १५ जण जखमी झाल्याची घटना मालेगाव ते मेहकर मार्गावरील टोलनाक्याजवळ गुरूवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. तीन जण गंभीर जखमी असून, त्यांना पुढील उपचारार्थ अकोला हलविण्यात आले.

Washim: Truck-bus accident on Malegaon-Mehkar road; 15 passengers injured | वाशिम : मालेगाव-मेहकर मार्गावर ट्रक व बसची धडक; बसमधील १५ प्रवासी जखमी

वाशिम : मालेगाव-मेहकर मार्गावर ट्रक व बसची धडक; बसमधील १५ प्रवासी जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देओव्हरटेक करत असताना झाला अपघातवडप येथील बंद टोलनाक्याजवळ घडली दुर्घटनातीन गंभीर जखमींना उपचारार्थ अकोल्याला हलविलेइतर जखमींवर मालेगावातील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्क
मालगाव - ट्रक व बसमध्ये अपघात होऊन १५ जण जखमी झाल्याची घटना मालेगाव ते मेहकर मार्गावरील टोलनाक्याजवळ गुरूवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. तीन जण गंभीर जखमी असून, त्यांना पुढील उपचारार्थ अकोला हलविण्यात आले.
एम.एच.४ डी.एस.३५५९ क्रमांकाचे रेतीची वाहतुक करणारे टाटा ४०७ वाहनाचे चालक विश्वंबर श्रीराम शिंदे वय रा.देवठाणा  ता.मंठा जि.जालना हे तळणीवरुन मालेगाव येथे रेती आणत होते तर मंगरुळपीर अगाराची एम.एच.४० एन.९८९६ क्रमांकाची मंगरुळपीर ते जालना  ही बस मालेगाववरुन जालनाकडे जात होती. वडप येथील बंद टोलनाक्याजवळ टाटा  ४०७ वाहन एका ट्रकला ओव्हरटेक करताना समोरुन आलेल्या बसवर समोरासमोर धडकले. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही प्राणहानी झाली नाही.

बसमधील १५ प्रवासी जखमी झाले. बस चालक मुंतजी मोद्दीन शेख (४४) रा.मंगरुळपीर, महादेव विष्णुराव वाघमोडे (२८) रा.तळणी, टाटाचालक विश्वंभर शिंदे रा.देवठाणा ता.मंठा हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने अकोला येथे हलविण्यात आले. या अपघातात त्र्यंबकेश्वर शिवाजी घायाळ (२३) रा.वाशिम, सुरेश वामन खिल्लारे (४०) रा.मेडशी, दिलीप मोतीराम सोनोने (मंगरुळपीर), प्रकाश शंकरराव वानखेडे (४५) आमडापुर, आशा देविदास निकम (५५) चिखली, चंंद्रकांत कचरु फुलझाडे (७०) देऊळगाव माळी, सचिन सहदेव शिरसाठ, अजय सुधाकर ताजणे (२२) रा. मालेगाव,  शितल हरी तायडे (३५) मेडशी व बाळु शिंदे (३३) देवठाणा ता.मंठा जि.जालना व अन्य दोज जण असे जखमी झाले आहेत. त्यांना ग्रामीण रुग्णालयात मालेगाव येथे भरती करुन वैद्यकीय अधिकारी  डॉ.सचिन वाढे व इतर डॉक्टर कर्मचारी यांनी उपचार केले. घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक जयकांत राठोड, पोलीस कर्मचारी पंजाब पवार यांच्यासह अन्य कर्मचाºयांनी या मार्गावरील वाहतुक सुरूळीत करण्याचा प्रयत्न केला. अर्ध्या तासानंतर वाहतूक सुरळीत झाली.  वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया मालेगाव पोलीस ठाण्यात सुरू होती.

Web Title: Washim: Truck-bus accident on Malegaon-Mehkar road; 15 passengers injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.