वाशिम : प्रलंबित विहिरी पूर्ण करण्यासाठी जिल्ह्याला एक कोटींचा निधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 02:33 AM2018-02-18T02:33:42+5:302018-02-18T02:34:18+5:30

वाशिम : रोजगार हमी योजनेंतर्गत प्रलंबित असलेल्या ४५0 विहिरींची कामे आता मार्गी लागणार आहेत. ७५ टक्के पूर्ण असलेल्या या विहिरींची उर्वरित कामे करण्यासाठी आवश्यक असलेला १ कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला असून, जिल्ह्यातील सहाही तालुक्यांच्या पंचायत समिती स्तरावरून अपूर्ण विहिरींचा अहवाल मागवून त्यानुसार निधीचे वितरण केले जाईल, अशी माहिती रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांनी शनिवारी दिली.

Washim: One crore funds to the district to complete the pending wells! | वाशिम : प्रलंबित विहिरी पूर्ण करण्यासाठी जिल्ह्याला एक कोटींचा निधी!

वाशिम : प्रलंबित विहिरी पूर्ण करण्यासाठी जिल्ह्याला एक कोटींचा निधी!

Next
ठळक मुद्देपंचायत समिती स्तरावरून मागविले प्रस्ताव कुशल मनुष्यबळावर होणार निधी खर्च

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : रोजगार हमी योजनेंतर्गत प्रलंबित असलेल्या ४५0 विहिरींची कामे आता मार्गी लागणार आहेत. ७५ टक्के पूर्ण असलेल्या या विहिरींची उर्वरित कामे करण्यासाठी आवश्यक असलेला १ कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला असून, जिल्ह्यातील सहाही तालुक्यांच्या पंचायत समिती स्तरावरून अपूर्ण विहिरींचा अहवाल मागवून त्यानुसार निधीचे वितरण केले जाईल, अशी माहिती रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांनी शनिवारी दिली.
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात विहिरींची कामे करण्यात आली; मात्र सिमेंट, रेती, गिट्टी यांसह काही ठिकाणी जेसीबीने झालेल्या या कामांसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून निधी मिळालेला नव्हता. परिणामी, ७५ टक्के काम झाल्यानंतर तब्बल ४५0 विहिरींच्या काम पूर्णत्वाचा दाखला मिळणे बाकी होते. यासंदर्भात रोजगार हमी योजना विभागाने शासनाकडे पाठपुरावा केला. त्याची दखल घेत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक कामे पूर्ण झालेल्या विहिरींची उर्वरित कामे मार्गी लावण्याकरिता शासनाने जिल्ह्याला १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांनी अपूर्ण विहिरींची सद्य:स्थिती आणि काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीसंदर्भातील सविस्तर अहवाल रोजगार हमी योजना कार्यालयाकडे सादर केल्यानंतर निधी वाटपाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती सुनील कोरडे यांनी दिली.

Web Title: Washim: One crore funds to the district to complete the pending wells!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम