वाशिम : नव्या तुरीला हमीपेक्षा ७00 रुपये कमी भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 01:55 AM2017-12-27T01:55:16+5:302017-12-27T01:56:54+5:30

वाशिम: यंदाच्या खरीप हंगामातील तुरीची आवक बाजारात सुरू झाली आहे; परंतु शासनाने घोषित केलेल्या ५ हजार ४५0 रुपये प्रति क्विंटल दरापेक्षा तब्बल ७00 रुपये कमी दराने नव्या तुरीची खरेदी बाजारात सुरू आहे. आधीच अपुर्‍या पावसामुळे उत्पादनात घट आल्यानंतर बाजारात मिळत असलेल्या नगण्यदराने शेतकरी अडचणीत आले आहेत. सद्यस्थितीत नव्या तुरीला बाजार समित्यांमध्ये ४५ ते ४७00 रुपये प्रति क्विंटलचे भाव मिळत आहेत. 

Washim: Less than 700 rupees less than new guarantee! | वाशिम : नव्या तुरीला हमीपेक्षा ७00 रुपये कमी भाव!

वाशिम : नव्या तुरीला हमीपेक्षा ७00 रुपये कमी भाव!

Next
ठळक मुद्देशेतकरी अडचणीतबाजारात नव्या तुरीची आवक सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: यंदाच्या खरीप हंगामातील तुरीची आवक बाजारात सुरू झाली आहे; परंतु शासनाने घोषित केलेल्या ५ हजार ४५0 रुपये प्रति क्विंटल दरापेक्षा तब्बल ७00 रुपये कमी दराने नव्या तुरीची खरेदी बाजारात सुरू आहे. आधीच अपुर्‍या पावसामुळे उत्पादनात घट आल्यानंतर बाजारात मिळत असलेल्या नगण्यदराने शेतकरी अडचणीत आले आहेत. सद्यस्थितीत नव्या तुरीला बाजार समित्यांमध्ये ४५ ते ४७00 रुपये प्रति क्विंटलचे भाव मिळत आहेत. 
वाशिम जिल्ह्यात यंदा ५0 हजार हेक्टरहून अधिक  क्षेत्रात तुरीची पेरणी झाली होती. वातावरणात वेळोवेळी झालेल्या विपरित बदलांमुळे या पिकाला आधीच फटका बसला. अपुरा पाऊस, ढगाळ वातावरणामुळे परिणाम होऊन या पिकाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घटले. अनेक शेतकर्‍यांना, तर तुरीचा खर्चही वसूल होणे कठीण झाल्याचे दिसत आहे. आता काही शेतकर्‍यांनी तुरीची काढणी करून ती बाजारात विकण्यास सुरुवात केली आहे. आवक कमी असली तरी, व्यापारी वर्गाकडून तुरीची अतिशय कमी दरात खरेदी करण्यात येत आहे. गतवर्षी शासनाकडून तुरीला ५ हजार ५0 रुपये प्रति क्विंटलचे हमीभाव घोषित करण्यात आले होते, यंदा त्यामध्ये ५00 रुपयांची वाढ करून तुरीचे हमीभाव ५ हजार ४५0 रुपये प्रति क्विंटल करण्यात आले; परंतु बाजारात मात्र शेतकर्‍यांची नवी तूर ६00 रुपये कमी दराने खरेदी करण्यात येत आहे. 
दुसरीकडे शेतकर्‍यांकडील सोयाबीन संपल्यानंतर मात्र या शेतमालाच्या भावात सतत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. साधारण दीड महिन्यांपूर्वी शेतकर्‍यांकडून २७00 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात येत असलेले सोयाबीन आता ३ हजार रुपयांपेक्षा अधिक दराने खरेदी केले जात आहे. अर्थात बाजार व्यवस्थेतील भाव पाडण्याच्या दृष्टचक्रामुळे शेतकर्‍यांची पिळवणूक होत असल्याचे स्पष्ट होत आहे. यासंदर्भात शासनानेच हस्तक्षेप करून हमीभावाने खरेदीची सक्ती करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा शेतकर्‍यांकडील तूर शेवटच्या दाण्यापर्यंत हमीभावापेक्षा कमी दरानेच खरेदी करून त्यांची लुबाडणूक कायमच राहणार आहे. 

शिल्लक असलेल्या जुन्या तुरीचे भाव गडगडले!
नव्या तुरीचे भाव ओलाव्यामुळे कमी असल्याचे कारण बाजार व्यवस्थेकडून समोर करण्यात येत असले तरी, जुन्या तुरीला त्यापेक्षाही कमी दर मिळत आहेत. सद्यस्थितीत गतवर्षीच्या तुरीचीही बाजारात बर्‍यापैकी आवक होत आहे; परंतु या तुरीला अद्यापही ४000 हजार ते ४२00 रुपये प्रति क्विंटल दरानेच खरेदी करण्यात येत आहे. भाववाढीसाठी वर्षभर प्रतिक्षा  करूनही शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच येत असल्याचे यावरून दिसत आहे. या परिस्थितीचा विचार करून शासनाने शेतकर्‍यांची पिळवणूक थांबविण्यासाठी तातडीने नाफेडमार्फत तुरीची खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.    

तुरीत ओलावा असल्यामुळे सध्या नव्या तुरीला ४५00 ते ४७५0 रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळत आहेत; परंतु तुरीला मागणी असल्यामुळे या शेतमालाचे भाव अधिक वाढणार आहेत. सद्य:स्थितीत बाजारात या शेतमालाची आवकही नावापुरतीच होत आहे.
- नीलेश भाकरे
सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, कारंजा लाड 

Web Title: Washim: Less than 700 rupees less than new guarantee!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.