वाशिम :मालमत्ता खरेदी-विक्री दिशाभूल प्रकरणाची ‘गुगल अर्थ’च्या सहाय्याने चौकशी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 06:30 PM2018-01-19T18:30:52+5:302018-01-19T18:37:30+5:30

वाशिम : मंगरूळपीर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व्हे नं. २१५/२ मध्ये असलेल्या ले-आऊट पैकी क्रमांक १० मध्ये एक मजली इमारतीत ४० गाळ्यांचे बांधकाम असताना या प्लॉटची विक्री खुला प्लॉट दाखवून केल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली होती.

 Washim: Inquiries of property deal with 'Google Earth' | वाशिम :मालमत्ता खरेदी-विक्री दिशाभूल प्रकरणाची ‘गुगल अर्थ’च्या सहाय्याने चौकशी !

वाशिम :मालमत्ता खरेदी-विक्री दिशाभूल प्रकरणाची ‘गुगल अर्थ’च्या सहाय्याने चौकशी !

Next
ठळक मुद्देमंगरूळपीर नगरपरिषद क्षेत्रातील इमारतीत ४० गाळ्यांचे बांधकाम असताना या प्लॉटची विक्री खुला प्लॉट दाखवून केल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. मंगरूळपीर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना याप्रकरणी नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिले.जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या निर्देशान्वये प्रथमच ‘गुगल अर्थ’ प्रणालीचा वापर करून या प्रकरणाची तपासणी करण्यात आली.


वाशिम : मंगरूळपीर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व्हे नं. २१५/२ मध्ये असलेल्या ले-आऊट पैकी क्रमांक १० मध्ये एक मजली इमारतीत ४० गाळ्यांचे बांधकाम असताना या प्लॉटची विक्री खुला प्लॉट दाखवून केल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या निर्देशान्वये प्रथमच ‘गुगल अर्थ’ प्रणालीचा वापर करून या प्रकरणाची तपासणी करण्यात आली. यामध्ये सदर प्लॉटवरील बांधकाम हे मार्च २०१७ पूर्वीचे निदर्शनास आल्याने मंगरूळपीर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना याप्रकरणी नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिले. तसेच या प्रकरणाशी संबधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सुध्दा कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
एक मजली इमारतीत ४० गाळ्यांचे बांधकाम असताना या प्लॉटची विक्री खुला प्लॉट दाखवून केल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणातील खरेदी-विक्री व्यवहाराची चौकशी करून संबंधितांवर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम १९५८ चे परिशिष्ट अनुच्छेद २५ ब व नोंदणी अधिनियम ३९ ब नुसार प्रतिमाह २ टक्के या प्रमाणे दंड आकारण्यात आला आहे. तसेच या मालमत्ता खरेदी-विक्री प्रकरणाशी संबंधित नगरपरिषद कर्मचाऱ्याविरुद्ध मुख्याधिकाऱ्यांनी प्रशासकीय कारवाई करून त्याची एक वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्यात आली  आहे. अशा प्रकारच्या चौकशीमध्ये प्रथमच ‘गुगल अर्थ’ सारख्या प्रणालीचा वापर करण्यात आला. त्यामुळे सदर प्लॉटवर झालेल्या बांधकामाची माहिती आधुनिक प्रणालीच्या सहाय्याने घेऊन प्लॉटवर झालेल्या बांधकामाच्या कालावधीची माहिती मिळाली.
कोणत्याही मालमत्तेची खरेदी-विक्री करताना विहित नियमांचे पालन करावे. याप्रकरणी शासनाची कोणत्याही प्रकारची दिशाभूल केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले.

Web Title:  Washim: Inquiries of property deal with 'Google Earth'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.