वाशिम : शैक्षणिक संस्था पायाभूत सुविधांसाठी प्रस्ताव सादर करा - नियोजन विभागाचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 08:04 PM2018-01-22T20:04:20+5:302018-01-22T20:04:30+5:30

वाशिम : अल्पसंख्याकबहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत असून सन २०१७-१८ या वर्षासाठी इच्छुक शाळांनी प्रस्ताव सादर करावे,  असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागाने सोमवारी केले. 

Washim: Educational Institutions submit proposals for infrastructure - Planning Department's appeal | वाशिम : शैक्षणिक संस्था पायाभूत सुविधांसाठी प्रस्ताव सादर करा - नियोजन विभागाचे आवाहन

वाशिम : शैक्षणिक संस्था पायाभूत सुविधांसाठी प्रस्ताव सादर करा - नियोजन विभागाचे आवाहन

Next
ठळक मुद्दे३१ जानेवारीपर्यंत मुदत

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अल्पसंख्याकबहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत असून सन २०१७-१८ या वर्षासाठी इच्छुक शाळांनी प्रस्ताव सादर करावे,  असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागाने सोमवारी केले. 
प्रस्तावासोबत स्वयंसाक्षांकित प्रतिज्ञापत्र, सदस्यांची यादी, शाळा,औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा अपंग शाळेचा डीआयइएस, इन्स्टिट्यूट, लायसन्स कोड, पटसंख्येचा दाखला, आगाऊ पावती, ट्रस्ट डीड सत्यप्रत, धर्मदाय आयुक्ताकडून प्राप्त अनुसूची, फेरफार अहवाल प्रत, नोंदणी प्रमाणपत्र प्रत (नोंदणी क्रमांक व वर्ष नमूद करावे), शाळेला शासनाने प्रदान केलेल्या मान्यतेची प्रत, पी. आर. कार्ड किंवा गाव नमुना सातबारा उतारा किंवा भाडेपावती, वार्षिक अहवाल (लगतच्या मागील चार पैकी तीन वषार्चे), दरपत्रकाची प्रत, अंदाजपत्रक (बांधकामाकरिता मागणी केली असल्यास), इमारतीचे छायाचित्र, मागणीची एकूण रक्कम व सुविधेचे स्वरूप, यापूर्वी निधी दिला असल्यास त्याबाबतचा वर्षनिहाय तपशील, यापूर्वी दिलेला निधी कोणकोणत्या सुविधांसाठी देण्यात आलेला आहे त्याचा वर्षनिहाय तपशील, यापूर्वी निधी दिला असल्यास त्याची वर्षनिहाय उपयोगिता प्रमाणपत्रे, शाळा स्वयंअर्थसहाय्यित नसल्याचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे सोबत जोडणे आवश्यक असल्याचे कळविण्यात आले आहे. 
 
Web Title: Washim: Educational Institutions submit proposals for infrastructure - Planning Department's appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.