वाशिम जिल्ह्यात २५ टक्के प्रवेशाची दुसरी लॉटरी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 06:35 PM2018-05-05T18:35:54+5:302018-05-05T18:35:54+5:30

वाशिम: सर्व शिक्षा अभियानांतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी निर्धारित लॉटरी प्रक्रियेतील दुसरा टप्पा ५ मे रोजी पार पडला.

In the Washim district, announce the second lottery for admission of 25% | वाशिम जिल्ह्यात २५ टक्के प्रवेशाची दुसरी लॉटरी जाहीर

वाशिम जिल्ह्यात २५ टक्के प्रवेशाची दुसरी लॉटरी जाहीर

Next
ठळक मुद्देएकूण ११२ शाळांतील ११७३ जागांसाठी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची आॅनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली.विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी लॉटरी प्रक्रि येतील दुसरा टप्पा शनिवार ५ मे रोजी पार पडला. विद्यार्थ्यांच्या पाल्यांना त्यांच्या पाल्यांचे प्रवेश निर्धारित मुदतीत करण्यासाठी शिक्षण विभागाच्यावतीने मेसेज पाठविण्यात आले आहेत.


वाशिम: सर्व शिक्षा अभियानांतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी निर्धारित लॉटरी प्रक्रियेतील दुसरा टप्पा ५ मे रोजी पार पडला. त्यानुसार वाशिम जिल्ह्यात या फेरीत २५८ विद्यार्थ्यांची निवड झाली असून. या विद्यार्थ्यांच्या पाल्यांना मोबाईलवर मेसेज पाठवून संबंधित शाळेत प्रवेश घेण्याच्या सुचना शिक्षण विभागाने केल्या आहेत.
वाशिम जिल्ह्यात २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेंतर्गत मंगरुळपीर तालुक्यातील १९, वाशिम तालुक्यातील ३०, रिसोड तालुक्यातील १२, मानोरा तालुक्यातील ९, कारंजा तालुक्यातील १४ आणि मालेगाव तालुक्यातील १८ मिळून एकूण ११२ शाळांतील ११७३ जागांसाठी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची आॅनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली. या अंतर्गत जिल्हाभरातून ११६३ अर्ज दाखल करण्यात आले. त्यानंतर गत महिन्यात १ मार्च रोजी विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी लॉटरी प्रक्रियेतील पहिली फेरी पार पडली. त्यामध्ये ४६४ विद्यार्थ्यांची निवड झाली. या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ४ एप्रिलपर्यंत पार पडली. त्यामध्ये निर्धारित मुुदतीत ३४६ विद्यार्थ्यांचे प्रवेश करण्यात आले. आता विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी लॉटरी प्रक्रि येतील दुसरा टप्पा शनिवार ५ मे रोजी पार पडला. यामध्ये २५८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, संबंधित विद्यार्थ्यांच्या पाल्यांना त्यांच्या पाल्यांचे प्रवेश निर्धारित मुदतीत करण्यासाठी शिक्षण विभागाच्यावतीने मेसेज पाठविण्यात आले आहेत.

Web Title: In the Washim district, announce the second lottery for admission of 25%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.