Washim District: 4100 beneficiary applications for agricultural use! | वाशिम जिल्हा : शेतीपयोगी अवजारांसाठी ४१०० लाभार्थींचे अर्ज प्राप्त!

ठळक मुद्दे ट्रॅक्टरसाठी १९८० व इतर अवजारांसाठी २१३० यानुसार ४११० लाभधारकांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत.  एका महिन्याच्या आत अवजाराच्या यादीतील शासनमान्य उत्पादकांचे ट्रॅक्टर, अवजार खरेदी करुन अनुदान मागणी प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.

वाशिम : ‘उन्नत शेती, समृध्द शेतकरी’ या अभियानांतर्गत तथा कृषि यांत्रिकीकरण योजनेतंर्गत जिल्ह्यात ट्रॅक्टरसाठी १९८० व इतर अवजारांसाठी २१३० यानुसार ४११० लाभधारकांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत.  शासनाच्या सुचनेनुसार संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडून निवडपत्र देण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे. आपल्या गावाच्या कृषि सहायकाकडे निवडपत्र देण्यात आलेले असून अर्ज केलेल्या लाभधारकांपैकी कोणाला निवडपत्र मिळाले नसल्यास, त्यांनी ते संपर्क साधून प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केले आहे.
निवडपत्र प्राप्त झाल्यानंतर लाभधारकांनी ट्रॅक्टर, अवजारे घेण्यासाठी पूर्वसंमती मिळण्यासाठी सातबारा, आठ-अ, अवजाराचे कोटेशन, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स प्रत, अवजाराचा तपासणी अहवाल तालुका कृषि अधिकारी कार्यालयात दहा दिवसाच्या आत अर्जासह सादर करावे. जे लाभधारक निवडपत्र दिल्यापासून दहा दिवसांच्या आत सर्व कागदपत्रासह पूर्वसंमती मिळण्यासाठीचा अर्ज सादर करतील, अशा लाभधारकांना प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार पुर्वसंमती देण्यात येईल. जे लाभधारक दहा दिवसाच्या आत पुर्वसंमतीसाठीचा प्रस्ताव सादर करणार नाहीत, अशा लाभधारकांचा प्रतीक्षा यादीतील अधिकार संपुष्टात येईल. सदर लाभधारकांना तद्नंतर पुर्वसंमती दिली जाणार नाही. पुर्वसंमती मिळालेल्या लाभधारकांना पुर्वसंमती मिळाल्यानंतर एका महिन्याच्या आत अवजाराच्या यादीतील शासनमान्य उत्पादकांचे ट्रॅक्टर, अवजार खरेदी करुन अनुदान मागणी प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे, असे कळविण्यात आले.

Web Title: Washim District: 4100 beneficiary applications for agricultural use!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.

प्रमोटेड बातम्या

संबंधित बातम्या

भवसागर माऊली पालखीचे नागरतास येथे स्वागत !

भवसागर माऊली पालखीचे नागरतास येथे स्वागत !

54 minutes ago

वाशिम जिल्ह्यात खरिपाची पिके बहरली ! 

वाशिम जिल्ह्यात खरिपाची पिके बहरली ! 

57 minutes ago

वाशिम जिल्हयात मच्छिमार संस्थांचे बळकटीकरण

वाशिम जिल्हयात मच्छिमार संस्थांचे बळकटीकरण

2 hours ago

हळदीला प्रती क्विंटल सात हजार रुपये दर !

हळदीला प्रती क्विंटल सात हजार रुपये दर !

21 hours ago

वाशिम जिल्ह्यात वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ

वाशिम जिल्ह्यात वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ

22 hours ago

वाशिम जिल्ह्यात वसंतराव नाईक यांची जयंती कृषीदिन म्हणून साजरी 

वाशिम जिल्ह्यात वसंतराव नाईक यांची जयंती कृषीदिन म्हणून साजरी 

1 day ago

प्रमोटेड बातम्या

वाशिम अधिक बातम्या

मतदार नोंदणी पुनरिक्षणांतर्गत मुख्याध्यापक, प्राचार्यांची कार्यशाळा

मतदार नोंदणी पुनरिक्षणांतर्गत मुख्याध्यापक, प्राचार्यांची कार्यशाळा

13 hours ago

कारंजात जुगारावर धाड; ११ आरोपींविरूद्ध गुन्हा

कारंजात जुगारावर धाड; ११ आरोपींविरूद्ध गुन्हा

14 hours ago

वाटोद येथे महिलेस मारहाण; चौघांविरूद्ध गुन्हा

वाटोद येथे महिलेस मारहाण; चौघांविरूद्ध गुन्हा

15 hours ago

वाशिम पालिकेच्या पार्किंग अटींमुळे व्यावसायिक अडचणीत

वाशिम पालिकेच्या पार्किंग अटींमुळे व्यावसायिक अडचणीत

15 hours ago

विजविषयक समस्या निकाली काढण्यासाठी शेतकरी धडकले महावितरणच्या कार्यालयावर !

विजविषयक समस्या निकाली काढण्यासाठी शेतकरी धडकले महावितरणच्या कार्यालयावर !

15 hours ago

जि.प. अध्यक्षांनी घेतला घरकुल योजनेचा आढावा !

जि.प. अध्यक्षांनी घेतला घरकुल योजनेचा आढावा !

16 hours ago