वाशिम : वाघोळा सरपंचांना अपात्र ठरवा - ग्राम पंचायत सदस्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 08:15 PM2018-01-11T20:15:26+5:302018-01-11T20:25:31+5:30

वाशिम: कारंजा पंचायत समिती अंतर्गत येणा-या वाघोळा ग्रामपंचायतमध्ये थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप करीत या ग्रामपंचायतमधील ३ सदस्यांनी जिल्हाधिका-यांकडे गुरुवारी केली आहे.

Washim: Demanding Waghola Sarpanch Disqualified - The demands of Gram Panchayat members | वाशिम : वाघोळा सरपंचांना अपात्र ठरवा - ग्राम पंचायत सदस्यांची मागणी

वाशिम : वाघोळा सरपंचांना अपात्र ठरवा - ग्राम पंचायत सदस्यांची मागणी

Next
ठळक मुद्देशासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप जिल्हाधिकार्‍यांकडे केली तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: कारंजा पंचायत समिती अंतर्गत येणा-या वाघोळा ग्रामपंचायतमध्ये थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप करीत या ग्रामपंचायतमधील ३ सदस्यांनी जिल्हाधिका-यांकडे गुरुवारी केली आहे.
ग्रामपंचायत अधिनियमानुसार ग्रामपंचायत सरपंचाने कोणत्याही शासकीय जागेवर अतिक्रमण केलेले नसणे आवश्यक आहे. तथापि, कारंजा पंचायत समिती अंतर्गत येणा-या वाघोळा येथील नवनियुक्त ग्रामपंचायत सरपंच भारत बाबाराव भगत यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले आहे. या संदर्भात ग्रामपंचायतमध्ये ठराव घेण्यात आला आणि त्या ठरावाच्या प्रतीसह जिल्हाधिकारी वाशिम यांच्याकडे अर्ज सादर करून सरपंचांना अपात्र ठरविण्याची मागणी हिराबाई दशरथ पवार, संत्रीबाई संतोष चव्हाण आणि बेबीताई विनोद सोनोने या तीन ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे. त्यांच्या अर्जावर सुनावणी दरम्यान जिल्हाधिकारी कोणता निर्णय घेतात. याकडे गावक-यांचे लक्ष लागले आहे. 
 
Web Title: Washim: Demanding Waghola Sarpanch Disqualified - The demands of Gram Panchayat members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.