VIDEO : दीड एकरात फुलविली संकरित आंब्यांची आमराई 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 03:48 PM2018-05-22T15:48:04+5:302018-05-22T15:48:04+5:30

अवघ्या दीड एकर क्षेत्रात संकरित आंब्यांच्या दीडशे झाडांची लागवड करून आमदाई फुलविण्याची किमया मंगरुळपीर येथील प्रगतशील शेतकरी महेंद्र इंगोले यांनी केली आहे. अवघ्या सव्वा वर्षाच्या कालावधित या आमराईतून त्यांनी उत्पन्नही घेणे सुरू केले आहे.

VIDEO: hybrid mangoes farm | VIDEO : दीड एकरात फुलविली संकरित आंब्यांची आमराई 

VIDEO : दीड एकरात फुलविली संकरित आंब्यांची आमराई 

googlenewsNext

वाशिम - अवघ्या दीड एकर क्षेत्रात संकरित आंब्यांच्या दीडशे झाडांची लागवड करून आमदाई फुलविण्याची किमया मंगरुळपीर येथील प्रगतशील शेतकरी महेंद्र इंगोले यांनी केली आहे. अवघ्या सव्वा वर्षाच्या कालावधित या आमराईतून त्यांनी उत्पन्नही घेणे सुरू केले आहे. 
केवळ पावसाच्या भरवशावर अवलंबून न राहता वेगवेगळे प्रयोग करून भरघोस उत्पन्न घेण्यात मंगरुळपीर येथील शेतकरी महेंद्र इंगोले यांचा हातखंडा आहे, केळी, निंबू, डाळींब, टरबुजाचे विक्रमी उत्पन्न त्यांनी आजवर घेतले आहे. तालुक्यातील खेर्डा खु. येथील शेतीत त्यांनी आता नवा प्रयोग केला असून, तो चांगलाच यशस्वी ठरत आहे. त्यांनी या शेतीत संकरित आंब्याच्या दीडशे झाडांची लागवड १५ महिन्यांपूर्वी केली. यामध्ये प्रामुख्याने जम्बो केशर आणि बारमाही या जातींचा समावेश आहे. योग्य नियोजन आणि व्यवस्थापनामुळे या झाडांची झपाट्याने वाढ झाली. लागवडीच्या वेळी दोन फुट उंच असलेली ही आंब्याची झाडे आता पाच ते सहा फूट उंच आणि भरदार झाली असून, त्यांना फळधारणाही होत आहे. यातील बारमाही जातीच्या झाडाला वर्षातून दोन वेळा फळधारणा होते. फळ आकाराने गोल आणि मोठे असून, आंबटपणा क मी असला तरी, चवीला चांगले असल्याने या फळांना मागणीही चांगली असते. जम्बो केशर हे केशर प्रकारातील आंबा फळ असून, या आंब्याचा आकाराही मोठा असतो. चवीने मधूर असलेले या फळाला मागणी आहे. महेंद्र इंगोले प्रायोगिक तत्त्वावर आंब्याची स्थानिक बाजारात विक्री करीत असले तरी, पुढे उत्पादनात वाढ करून या फळांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यात करून अधिक उत्पन्न मिळविण्याचा त्यांचा मानस आहे.

Web Title: VIDEO: hybrid mangoes farm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.