बसस्थानक परिसरात ‘नो पार्किंग’मध्येच वाहन पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 04:14 PM2019-01-23T16:14:36+5:302019-01-23T16:14:57+5:30

वाशिम :  बसस्थानक परिसराच्या २०० मीटर अंतरापर्यंत खासगी  प्रवासी वाहनांना थांबा नाही तसेच लांब पल्ल्याच्या खासगी वाहनांना टप्पा वाहतूक करता येत नाही. असे असतानाही वाशिम येथे या नियमाचे उल्लंघन होत असल्याचे चित्र वाशिम शहरामध्ये दिसून येत आहे. 

Vehicle Parking in 'No Parking' in bus station area |  बसस्थानक परिसरात ‘नो पार्किंग’मध्येच वाहन पार्किंग

 बसस्थानक परिसरात ‘नो पार्किंग’मध्येच वाहन पार्किंग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :  बसस्थानक परिसराच्या २०० मीटर अंतरापर्यंत खासगी  प्रवासी वाहनांना थांबा नाही तसेच लांब पल्ल्याच्या खासगी वाहनांना टप्पा वाहतूक करता येत नाही. असे असतानाही वाशिम येथे या नियमाचे उल्लंघन होत असल्याचे चित्र वाशिम शहरामध्ये दिसून येत आहे. 
नियमानुसार बसस्थानकापासुन २०० मीटरच्या अंतरावरूनच खाजगी वाहतुक व्हायला हवी. पण वाशिम येथे अकोलाकडे जाणाºया खाजगी बस, काली पिली वाहने व काही लक्झरी बसस्थानकाच्या प्रवेशव्दारापासून अगदी  कमी अंतरावरुन प्रवासी घेवून जातात. काही वाहने तर चक्क बसस्थानकाजवळच उभे राहतांना दिसून येतात. एस.टी. आगारातून प्रवासी पळविणारे खासगी ‘एजन्ट’ बसस्थानकामध्ये शिरुन चक्क अकोला-अकोला असे आवाज देवून प्रवाशांना घेवून जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. वाशिम येथून काही प्रमुख शहरांसह ग्रामीण भागात मात्र सर्रास खाजगी प्रवासी वाहतूक सुरू आहे.  खाजगी वाहतूक करणारी वाहने जागेवरुन निघाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी थांबून टप्पा वाहतुक करते. बस वाहतुकीच्या वेळी त्या बससमोर आपले वाहन कसे  धावेल याची काळजी खासगी वाहनधारकांकडून घेतली जाते.  आॅटो व अन्य वाहनेदेखील तर बसस्थानक परिसरात २०० मिटरच्या आतच उभे केले जातात. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरले जातात. या अवैध प्रवाशी वाहतुकीमुळे एस.टी. महामंडळाचे आर्थिक नुकसान तर होतच आहे.  शिवाय प्रवाशांच्या जिवित्वास सुध्दा धोका निर्माण झाला आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे. 
 
 रुग्णांना घेवून येणाऱ्या वाहनांना आत येण्यास मुभा!
खासगी वाहनांना बसस्थानक आवारात येण्यास मनाई असून त्यात प्रवासाी घेवून जाणारे वाहन असल्यास त्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी पोलीस कर्मचाºयांना कल्पना देण्यात येते. परंतु कोणतेही वाहन रुग्णांना घेवून बस आवारात येत असल्यास त्यास कोणताही मज्जाव नाही. याकरिताच बसस्थानकासमोरील गेट समोर लावण्यात आलेल्या पाईप काढून टाकण्यात आल्याची माहिती वाशिम आगाराकडून देण्यात आली आहे.
 
बसस्थानकापासून २०० मिटरवर खाजगी वाहतुकीची वाहने उभी करावीत. २०० मिटरच्या आत वाहने आढल्यास त्यावर कारवाई करण्यासंदर्भात वेळोवेळी पोलीस स्टेशनशी तसेच जिल्हा पोलीस अधिक्षकांशी संपर्क केला आहे.
- डी.एम. इलमे, आगार व्यवस्थापक, वाशिम

Web Title: Vehicle Parking in 'No Parking' in bus station area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.