‘एटीएम कार्ड’ तपासणीच्या नावाखाली दोघांची फसवणूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 02:08 AM2017-11-21T02:08:26+5:302017-11-21T02:09:37+5:30

वाशिम: ‘एटीएम कार्ड’ला आधार क्रमांक जोडला गेला नसल्याने तुमच्या कार्डचे ‘व्हेरीफिकेशन’ करायचे आहे, असे कारण दाखवून अज्ञात आरोपींनी शहरातील दोघांना २९ हजार रुपयांनी गंडविल्याचा प्रकार सोमवार, २0 नोव्हेंबरला उघडकीस आला. 

Two cheating in the name of 'ATM card' inspection! | ‘एटीएम कार्ड’ तपासणीच्या नावाखाली दोघांची फसवणूक!

‘एटीएम कार्ड’ तपासणीच्या नावाखाली दोघांची फसवणूक!

Next
ठळक मुद्देवाशिम येथील घटनाआरोपींविरूद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: ‘एटीएम कार्ड’ला आधार क्रमांक जोडला गेला नसल्याने तुमच्या कार्डचे ‘व्हेरीफिकेशन’ करायचे आहे, असे कारण दाखवून अज्ञात आरोपींनी शहरातील दोघांना २९ हजार रुपयांनी गंडविल्याचा प्रकार सोमवार, २0 नोव्हेंबरला उघडकीस आला. 
याबाबत प्राप्त माहितीनुसार, धनंजय राजाभाऊ राऊत (रा. आययुडीपी कॉलनी) यांना अज्ञात व्यक्तीने फोन करून म्हटले की मी स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतून बोलत आहे. तुमच्या एटीएम कार्डला आधार लिंक नसल्याने तुमचे एटीएम कार्ड मी ब्लॉक करणार होतो, परंतु तुम्ही आमचे जुने ग्राहक असल्याने कार्ड ब्लॉक न करता तुमचा एटीएम कार्डवरील १६ आकडी नंबर सांगा, त्यानंतर मोबाइलवर आलेला ओटीपी नंबर सांगा. ही सर्व माहिती राऊत यांनी अज्ञात व्यक्तीला दिली. त्यावरून राऊत यांच्या खात्यामधून काही क्षणातच दहा हजार रूपये काढून घेतले. या घटनेची राऊत यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये २0 नोव्हेंबरला तक्रार नोंदविली. त्यावरून पोलीसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला. दुसर्‍या घटनेत उपरोक्त आरोपीप्रमाणेच संभाषण करून धुलाप्पा मासाळ (रा. वाशिम) यांच्या कॅनरा बँक खात्यातून २४ हजार रूपये नेटबँकींगद्वारे काढून घेतल्याची घटना घडली. या घटनेची मासाळ यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये २0 नोव्हेंबरला तक्रार नोंदविली. त्यावरून पोलीसांनी अज्ञात आरोपींविरूद्ध कलम ४२0 अन्वये गुन्हा दाखल केला. 

Web Title: Two cheating in the name of 'ATM card' inspection!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.