किटकनाशकांमुळे तिघांना विषबाधा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 08:03 PM2017-10-29T20:03:02+5:302017-10-29T20:06:11+5:30

वाशिम: किटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होण्याच्या घटनांचे लोण आता वाशिम जिल्ह्यातही पसरत असल्याचे दिसत असून, आजवर एका शेतक-यासह दोन शेतमजुरांना फवारणी करतेवेळी विषबाधा झाल्याच्या घटना जिल्ह्यात विविध ठिकाणी घडल्या आहेत.

Three insecticides cause poisoning! | किटकनाशकांमुळे तिघांना विषबाधा!

किटकनाशकांमुळे तिघांना विषबाधा!

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात किटकनाशांचा वाढता वापरकृषी विभागाने दखल घेण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम: किटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होण्याच्या घटनांचे लोण आता वाशिम जिल्ह्यातही पसरत असल्याचे दिसत असून, आजवर एका शेतक-यासह दोन शेतमजुरांना फवारणी करतेवेळी विषबाधा झाल्याच्या घटना जिल्ह्यात विविध ठिकाणी घडल्या आहेत. त्यामध्ये मालेगाव येथे २८ आॅक्टोबर रोजी हरभरा पिकावर फवारणी करताना शेतक-यास विषबाधा झाल्याच्या घटनेचा समावेश आहे.  
यवतमाळ जिल्ह्यात किटकनाशक फवारणीनंतर विषबाधा झाल्याने शेतकºयांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने राज्यभरात एकच खळबळ उडालेली आहे. सतर्कता म्हणून कृषी सेवा केंद्रांची तपासणी आणि शेतकºयांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना वरिष्ठ स्तरावरून देण्यात आल्या आहेत. असे असतानाही जिल्ह्यात विविध ठिकाणी तीन शेतमजुरांसह एका शेतकºयासह किटकनाशकाची फवारणी करताना विषबाधा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये वाशिम तालुक्यातील एका गावात शेतमजुराला फवारणी करताना विषबाधा झाल्याची घटना ताजी 
असतानाच आता मालेगाव मालेगाव तालुक्यांतर्गत येत असलेल्या ग्राम वसारी येथे शेतातील हरबºयावर फवारणी करणाºया शेतकºयाला विषबाधा झाल्याची घटना २८ आॅक्टोबर रोजी 
घडली. वसंता किसन जाधव ( ५०) असे बाधित शेतकºयाचे नाव आहे. वसंता जाधव यांच्या शेतातील हरबºयावर कीडिंचा प्रादूर्भाव झाला. त्यामुळे शनिवारी सकाळी ते हरबºयावर फवारणी करण्यासाठी गेले. फवारणी दरम्यान, त्यांना गरगरल्या सारखे वाटू लागल्याचे लक्षात आले. सदर प्रकार त्यांनी शेतातील मजुांना सांगीतल्याने वसंता जाधव यांना वाशीम जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले.विष बाधित शेतकऱ्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे. दरम्यान, यापूर्वी कारंजा तालुक्यातही अशीच एक घटना घडली आहे. 
 

Web Title: Three insecticides cause poisoning!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती