मंगरुळपीर शहरात १३ दिवसापासुन पुरवठाच  नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 01:44 PM2018-02-21T13:44:46+5:302018-02-21T13:46:27+5:30

मंगरुळपीर:  शहरात पाणीटंचाई समस्या उग्ररुप धारण करु लागली आहे गेल्या  १३ दिवसापासुन नागरीकांना पाणी पुरवठाच झालेला नाही त्यामुळे पाण्याअभावी नागरीकाचे प्रचंड हाल होत असुन नागरीक टँकरचे पाणी विकत घेउन गरजा भागवित आहे.

There is no supply for 13 days in Mangalore City | मंगरुळपीर शहरात १३ दिवसापासुन पुरवठाच  नाही

मंगरुळपीर शहरात १३ दिवसापासुन पुरवठाच  नाही

googlenewsNext
ठळक मुद्देमोतसावंगा धरणावर केवळ मंगरुळपीर शहरच नव्हे तर वाशिम आणि मंगरुळपीर तालुक्यातील मिळुन इतरही 21 गावे अवलंबुन आहेत. अवर्षाणामुळे मोतसावंगा धरणात पाणीसाठाच झाला नाही परिणामी आता या धरणाने तळ गाठायला सुरुवात केली आहे.मोतसावंगा धरणाशिवाय इतर कुठलाही पर्याय ही गरज पुर्ण करण्यासाठी उपलब्ध करण्यात आला नाही.

मंगरुळपीर:  शहरात पाणीटंचाई समस्या उग्ररुप धारण करु लागली आहे गेल्या  १३ दिवसापासुन नागरीकांना पाणी पुरवठाच झालेला नाही त्यामुळे पाण्याअभावी नागरीकाचे प्रचंड हाल होत असुन नागरीक टँकरचे पाणी विकत घेउन गरजा भागवित आहे 
मंगरुळपीर शहराला मोतसावंगा धरणातुन पाणीपुरवठा करण्यात येत असुन 35 हजार लोकसंख्या असलेल्या या शहराला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते.ही गरज भागविण्यासाठी मोतसावंगा धरणातुन पाणीपुरवठा योजना 30 वर्षापुर्वी सुरु करण्यात आली दिवसैदिवस वाढत जाणार्‍या लोकसंख्खेनुसार आता 30 वर्षापुर्वीच्या तुलनेत मंगरुळपीर शहराची पाण्याची गरज दुप्पट झाली आहे परंतु मोतसावंगा धरणाशिवाय इतर कुठलाही पर्याय ही गरज पुर्ण करण्यासाठी उपलब्ध करण्यात आला नाही मोतसावंगा धरणाची जलधारण क्षमता फारसी वाढली नाही त्यातच एखाद्या वर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पाउस झाल्यास धरणात आवश्यक प्रमाणात जलसंचय होत नाही विशेष म्हणजे या मोतसावंगा धरणावर केवळ मंगरुळपीर शहरच नव्हे तर वाशिम आणि मंगरुळपीर तालुक्यातील मिळुन इतरही 21 गावे अवलंबुन आहेत. आता सन 2017 च्या पावसाळ्यात अवर्षाणामुळे मोतसावंगा धरणात पाणीसाठाच झाला नाही परिणामी आता या धरणाने तळ गाठायला सुरुवात केली आहे.त्याची सर्वाधिक झळ मंगरुळपीर शहराला बसली आहे मंगरुळपीर शहराला यामुळे पाणीपुरवठा होणे कठीण झाले असुन गेल्या 13 दिवसापासुन पाणीपुरवठाच झाला नाही त्यामुळे नागरीकांचे पाण्याअभावी हाल होत आहे गरजा भागविण्यासाठी लोक खाजगी टँकरने पाणी विकत घेत आहे दरम्यान मंगरुळपीर शहरातील पाणीटंचाईला नियंत्रीत करण्यासाठी पर्यायी उपाय म्हणुन सोनाळा धरणातील पाणी मोतसावंगा धरणात आणण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत

Web Title: There is no supply for 13 days in Mangalore City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.