प्रलंबित मानधनासाठी ‘थाळी नाद’ आंदोलन

By Admin | Published: April 28, 2017 01:44 AM2017-04-28T01:44:15+5:302017-04-28T01:44:15+5:30

जिल्हा परिषेदसमोर धरणे: पोषण आहार स्वयंपाकी, मदतनीस, बचतगट सदस्यांचा सहभाग

'Thali Nad' movement for pending honoration | प्रलंबित मानधनासाठी ‘थाळी नाद’ आंदोलन

प्रलंबित मानधनासाठी ‘थाळी नाद’ आंदोलन

googlenewsNext

वाशिम: मागील १० महिन्यांपासून प्रलंबित असलेले मानधन मिळण्यासह विविध मागण्यांसाठी शालेय पोषण आहार स्वयंपाकी, मदतनीस, बचतगट संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने गुुरवारी जिल्हा परिषद कार्यालय परिसरात एकदिवसीय थाळीनाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो कामगारांनी सहभाग नोंदविला.
जिल्ह्यातील पोषण आहार शालेय पोषण आहार स्वयंपाकी, मदतनीस, बचतगट संघटनेचे मागील ८ महिन्यांपासून त्यांचे मानधन मिळाले नाही. त्याशिवाय त्यांना भाजीपाला, इंधनाच्या खर्चाची रक्कमही अदा करण्यात आलेली नाही. पोषण आहार कामगार, बचतगटाच्यावतीने या संदर्भात सर्व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मानधन अदा करण्याची मागणी करण्यासह मानधन १० हजार रुपये देवून कायम सेवेत घ्यावे, महिला बचतगटामार्फत राशन दुकानामधील सर्व वस्तू गटामार्फत देण्यात यावे, शालेय पोषण आहार योजनेतंर्गत डाटा एंट्री आॅपरेटर यांना २० हजार रुपये मानधन द्यावे, कामावरून कमी केलेल्या स्वयंपाकी व मदतनिस यांना तत्काळ कामावर घ्यावे यासह इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद कार्यालय परिसरात उपोषण, धरणे आंदोलनही करण्यात आले; परंतु अद्याप प्रशासनाने त्यांच्या मागण्यांची दखल घेतल नाही. दरम्यान, या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता. शालेय पोषण आहाराचे मानधन देण्यासाठी प्राप्त निधीतून संबंधितांना मानधन देण्यात येते. आता यासाठी निधी अपुरा प्राप्त होत असल्याने पोषण आहार स्वयंपाकी, मदतनिसांचे मानधन रखडले असून, निधी प्राप्त होताच त्यांचे मानधन संबंधित पंचायत समित्यांमार्फत त्यांना अदा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी, अद्याप त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी पोषण आहार, स्वयंपाकी, मदतनीस, कामगार व बचत गट संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसत एक ताट व एक चमचा घेवून थाळीनाद मोर्चा व जिल्हा परिषदेवर सकाळी ११ वाजतापासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांच्यावतीने मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदनावर जिल्हाध्यक्ष अनुराधा काळे, उपाध्यक्ष रेखा लहाने, जिल्हा संघटक बेबी भगत यांचेसह स्वाक्षरी आहे. या आंदोलणात पोषण आहार कामगारांनी मोठ्यासंख्येने सहभाग नोंदविला.

Web Title: 'Thali Nad' movement for pending honoration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.