गोड बोला, गुड बोला : गोड बोलण्यासाठी जीभ नावाचे इंद्रिय कह्यात हवे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 05:43 PM2019-01-21T17:43:57+5:302019-01-21T17:44:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : गोड बोलून समोरच्याला जणू हरभºयाच्या झाडावर बसविले की झाले. त्यासाठी मात्र जीभ नावाचे आपले ...

Tald sweet, talk good : To speak sweet, should control on tongue! | गोड बोला, गुड बोला : गोड बोलण्यासाठी जीभ नावाचे इंद्रिय कह्यात हवे!

गोड बोला, गुड बोला : गोड बोलण्यासाठी जीभ नावाचे इंद्रिय कह्यात हवे!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गोड बोलून समोरच्याला जणू हरभºयाच्या झाडावर बसविले की झाले. त्यासाठी मात्र जीभ नावाचे आपले इंद्रिय आपल्या कह्यात पाहिजे. अर्थात हे सगळ्यांनाच जमते असे नाही; पण ज्यांना जमते ते सर्वसुखी म्हणता येतील. त्याचाही अभ्यासच हवा. त्यांच्यासाठी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रोत्रादि इंद्रिये आवरिती/ परि रसने नियमु न करिती/ ते सहस्रधा कवळिजती/ विषयीं इहीं//
‘पिंडे पिंडे मतिर्भिन्न:’ असे शास्रवचन आहे. स्थिरमती, शुद्धमती, विक्षिप्तमती, अल्पमती, मंदमती असे मतीनुसार माणसांचे प्रकार पडतात. कोण कशा मतीचा आहे, हे ओळखणे फारसे अवघड नसते. समोरचा माणूस ओळखीचा नसेल आणि तो एक शब्दही बोलला नाही तरी त्याची मती कशाप्रकारची असू शकते हे मुद्राभ्यासाने काही प्रमाणात ओळखता येऊ शकते. तुमच्या विचारांची बैठक कशी आहे, हे वाचा स्पष्ट करते. त्यामुळे शहाणी माणसे मोजकं बोलतात. ‘बोलु ऐसे बोले, तेणे विठ्ठल विठ्ठल डोले’ ही बोलण्यातील ताकद अंगी असणारी माणसे फार विरळ असतात.
सामान्य आणि असामान्य अशी माणसांची वर्गवारी विचारात घेतली तर असामान्यांसाठी ‘गोड बोला’ हा संदेश असणारच नाही. कारण त्यांना तसे सांगण्याची गरज नसते. तेथे ‘झरा मुळचाची खरा’ असतो. प्रश्न असतो सामान्य जनांचा. यातली एक जमात धूर्त, बेरकी, लबाड, स्वार्थी, कपटी, संधीसाधू, दीर्घद्वेषी, संकुचित प्रवृत्तीची, इतरांना फसवण्यात धन्यता मानणारी इत्यादि स्वभाव वैशिष्टे असणारी असते. त्यांना शब्दाची किंमत काय कळणार? अशी माणसे समोरच्याला कितीही गोड बोलली तर त्याला ते पटणारे नसते. त्यामुळे इतरेजन त्यांच्या गोड बोलण्याला फसत नाहीत. 

तुकाराम महाराजांनी ‘बोल बोलता सोपे वाटे, करणी करता टीर फाटे’ असे सडेतोडपणे सांगितले आहे.  ‘गोड बोला’ असे म्हणणे सोपे; पण ‘गोड बोलणे’, हे नेमके कुठून यायला हवे. जेथून ते येणे अपेक्षित आहे, तेथून ते खरेच येते का, हा खरा प्रश्न आहे. त्याचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे.

Web Title: Tald sweet, talk good : To speak sweet, should control on tongue!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.