देवा सरकारला सद्बुद्धी दे!...स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मालेगावात केले होमहवन आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 05:07 PM2018-01-30T17:07:54+5:302018-01-30T17:09:42+5:30

मालेगाव (वाशिम) : वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांच्या झालेल्या मृत्यूच्या पृष्ठभूमिवर भगवंत रामाने आतातरी विद्यमान शासनाने सद्बुद्धी प्रदान करावी, अशी याचना करणारे आगळेवेगळे होमहवन आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ३० जानेवारीला येथील श्रीराम मंदिरात केले. 

Swabhimani Shetkari Sanghatana has organized the Movement in Malegaon | देवा सरकारला सद्बुद्धी दे!...स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मालेगावात केले होमहवन आंदोलन

देवा सरकारला सद्बुद्धी दे!...स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मालेगावात केले होमहवन आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्देस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मालेगावातील शिव चौकस्थित श्रीराम मंदिरात ३० जानेवारीला दुपारी १ वाजता होमहवन करण्यात आला. तसेच शेतकरी धर्मा पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


मालेगाव (वाशिम) : वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांच्या झालेल्या मृत्यूच्या पृष्ठभूमिवर भगवंत रामाने आतातरी विद्यमान शासनाने सद्बुद्धी प्रदान करावी, अशी याचना करणारे आगळेवेगळे होमहवन आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ३० जानेवारीला येथील श्रीराम मंदिरात केले. 
धुळे जिल्ह्यातील विखरण (ता.शिंदखेडा) येथील ८० वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांनी सौरऊर्जा प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला. मात्र, त्याची कुणीच दखल न घेतल्याने धर्मा पाटील यांनी २२ जानेवारी रोजी अखेर मंत्रालयातच विष प्राशन केले. रविवारी रात्री उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. तथापि, शासनाने धर्मा पाटील यांच्या मागणीची वेळीच दखल घेतली असती तर ही वेळच ओढवली नसती. त्यामुळे विद्यमान शासनाला भगवान रामा ने किमान आतातरी सद्बुद्धी द्यावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मालेगावातील शिव चौकस्थित श्रीराम मंदिरात ३० जानेवारीला दुपारी १ वाजता होमहवन करण्यात आला. तसेच शेतकरी धर्मा पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामुअण्णा इंगोले, दत्ता जोगदंड, ओमप्रकाश गायकवाड, उमेश आंधळे, रवि लहाने, प्रमोद कुटे उपस्थित होते.

Web Title: Swabhimani Shetkari Sanghatana has organized the Movement in Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.