स्टेट बँक अपहार प्रकरणाने कर्जदारांमध्ये खळबळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 02:08 AM2017-11-04T02:08:57+5:302017-11-04T02:10:15+5:30

मंगरुळपीर: येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतील प्रमोद ठाकरे नामक कर्मचार्‍याने कर्जदार ग्राहकांच्या नावे कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याची शक्यता असून, यामुळे कर्जदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

State Bank Of India Embezzlement Case | स्टेट बँक अपहार प्रकरणाने कर्जदारांमध्ये खळबळ!

स्टेट बँक अपहार प्रकरणाने कर्जदारांमध्ये खळबळ!

Next
ठळक मुद्देमंगरूळपीर येथील प्रकार अनेक प्रतिष्ठित अडचणीत येण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर: येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतील प्रमोद ठाकरे नामक कर्मचार्‍याने कर्जदार ग्राहकांच्या नावे कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याची शक्यता असून, यामुळे कर्जदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अनेक कर्जदार आपापल्या खात्यांची तपासणी करीत असून, तालुक्यासह शहरातील अनेक प्रतिष्ठित याप्रक्ररणी अडचणीत येण्याची शक्यता  वर्तविली जात आहे. 
अकोट तालुक्यातील अकोली जहागीर येथील भारतीय स्टेट बँक शाखेत अधिकारी असलेल्या प्रमोद ठाकरे यांनी १८ लाख रुपयांच्या रकमेची अफरातफर केल्याने २६ ऑक्टोबर रोजी त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यास १ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. याच अधिकार्‍याने मंगरूळपीरच्या शाखेत कार्यरत असताना तब्बल सात कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा संशय आता व्यक्त केला जात आहे. कर्ज घेणार्‍या ग्राहकांच्या खात्यामध्ये अफरातफर करून हा घोटाळा झाल्याची चर्चा असून, याप्रकरणी बँकेने गंभीर दखल घेतली असून, बारकाईने तपास केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

प्रतिष्ठितांवर कारवाईची टांगती तलवार
या प्रकरणात मंगरूळपीर तालुक्यासह शहरातील काही सधन शेतकरी, व्यापार्‍यांचाही सहभाग असल्याची शक्यता असून, मागील आठवड्यात अकोट पोलीस यांसंबंधी तालुक्यातील जोगलदरी व शेगी याठिकाणी तपासकामी आले होते. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य पाहता यामध्ये अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता आहे. 

शेतकर्‍यांच्या कर्जाची रक्कम हडपणार्‍यांवर कठोर कारवाईसाठी लुंगे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
शेतकर्‍यांच्या कर्जाची रक्कम हडपणार्‍या मंगरूळपीरच्या भारतीय स्टेट बँक शाखेतील दोषी अधिकार्‍यांची व त्यांच्या दलालांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश लुंगे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे. निवेदनात नमूद आहे की, मंगरुळपीर तालुक्यासह शहरातील शेतकर्‍यांची भारतीय स्टेट बँक शाखेतील एका अधिकार्‍याने तसेच स्वत:ला प्रतिष्ठित म्हणवून घेणार्‍या दलालांनी शेतकर्‍यांना कर्जाची रक्कम अर्धवट देऊन उर्वरित रकमेचा अपहार केला. याप्रकरणी शासन स्तरावरून संबंधितांच्या खात्यातील व्यवहारांची चौकशी करुन शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी लुंगे यांनी केली आहे. 
-
 

Web Title: State Bank Of India Embezzlement Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक