पिकाच्या पैसेवारीवरून शिवसैनिक आक्रमक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 05:28 PM2017-10-30T17:28:08+5:302017-10-30T17:28:45+5:30

Shivsainik aggressive for the payment of the crop! | पिकाच्या पैसेवारीवरून शिवसैनिक आक्रमक !

पिकाच्या पैसेवारीवरून शिवसैनिक आक्रमक !

googlenewsNext
ठळक मुद्देपैसेवारी ५० च्या च्या आत घोषित करा तहसिलदारांना निवेदन

वाशिम: शेतमालाचे घसरलेले दर, घटलेले पर्जन्यमान आणि त्यामुळे खरिप हंगामातील शेतमालाच्या उत्पादनातील प्रचंड घट तद्वतच अडचणीत सापडलेला रब्बी हंगाम या सर्व बाबी दुर्लक्षित ठरवत जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्वच गावांची नजर अंदाज पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक अर्थात सरासरी ५८ पैसे जाहीर केलेली आहे. वाशिम तालुक्यातील पैसेवारी ५५ असून, तालुक्यातील पिकाची पैसेवारी ५० पैशाच्या आत घोषित करण्याची मागणी शिवसेना तालुका शाखेच्यावतीने सोमवारी वाशिम तहसिलदारांकडे करण्यात आली.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, विदर्भ संपर्क प्रमुख दिवाकर रावते यांच्या आदेशानुसार तसेच खासदार भावना गवळी, जिल्हाप्रमुख राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उपजिल्हाप्रमुख माणिकराव देशमुख, तालुकाप्रमुख रामदास मते पाटील, शहरप्रमुख गजानन भांदुर्गे आदींनी वाशिम तहसिलदारांना निवेदन दिले. वाशिम तालुक्यात कमी पावसामुळे सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती आहे. कमी पावसामुळे यंदा तालुक्यात अनेक शेतकºयांच्या शेतात सोयाबीन पिकाचे उत्पादन झाले  नाही. तर अनेक शेतकºयांना सोयाबीनचे एकरी उत्पादन अत्यल्प झाले. निसर्गाच्या या प्रकोपामुळे शेतकºयांची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे.  अशा परिस्थितीत शेतकºयांना आधार देण्यासाठी शासनाने तालुक्यातील पिकाची पैसेवारी ५० च्या आत घोषीत करुन शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. 

 यावेळी जि.प. सदस्य हरिदास कोरडे, ख.वि. संचालक पांडूरंग पांढरे, शिवसेना उपतालुकाप्रमुख विजय खानझोडे, विठ्ठल चौधरी, रामदास ठाकरे, सर्कलप्रमुख बालु माल, सखाराम चौधरी, प्रल्हाद गावंडे, अनसिंग शहरप्रमुख संतोष गावंडे, जगन कापसे, शामसिंग ठाकुर, दिलीप शिंदे, बबन मुळे, गजानन बरडे, गोपाल लव्हाळे, गजानन भुरभुरे, गणेश पवार, हरिभाऊ ठाकरे, संजय सोळंके, घोडके महाराज, गणेश महाले, गजानन टेकाळे, शिवाजी डोंगरदिवे, भागवत खाडे, नारायण डाखोरे, गजानन खाडे आदी शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Shivsainik aggressive for the payment of the crop!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.