विज्ञान सांगते ... भूत, भानामती, करणी, मूठ सारेच झूठ! - निलेश मिसाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 07:54 PM2017-10-03T19:54:43+5:302017-10-03T19:55:19+5:30

जनतेच्या हीताचा व शोषणमुक्त समाजनिर्मितीसाठी जादुटोणा विरोधी कायदा हा क्रांतीकारी कायदा शासनाने आणला. या कायद्याबाबत जनजागृती व प्रचार प्रसार व्यापक व मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे. या कायद्यामूळे जनतेचे शोषण थांबेल व बुद्धीप्रामाण्यवादी समाजाची निर्मिती होईल,असे प्रतिपादन निेलेश मिसाळ यांनी केले.

Science tells us ... ghost, baanamati, karani, stupa all lies! - Nilesh Mistle | विज्ञान सांगते ... भूत, भानामती, करणी, मूठ सारेच झूठ! - निलेश मिसाळ

विज्ञान सांगते ... भूत, भानामती, करणी, मूठ सारेच झूठ! - निलेश मिसाळ

Next
ठळक मुद्देअंधश्रद्धा निर्मुलन ही काळाची गरज शोषणमुक्त समाजनिर्मितीसाठी जादुटोणा विरोधी कायदा 

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम):  करणी, भानामती, मुठ हे सारेख झुठ असल्याचे विज्ञान सांगते . अंधश्रद्धा  समाजाला लागलेली कीड असून त्यापासून संपुर्ण समाज मुक्त करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मुलन ही काळाची गरज आहे. जनतेच्या हीताचा व शोषणमुक्त समाजनिर्मितीसाठी जादुटोणा विरोधी कायदा हा क्रांतीकारी कायदा शासनाने आणला. या कायद्याबाबत जनजागृती व प्रचार प्रसार व्यापक व मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे. या कायद्यामूळे जनतेचे शोषण थांबेल व बुद्धीप्रामाण्यवादी समाजाची निर्मिती होईल,असे प्रतिपादन निेलेश मिसाळ यांनी केले. येथून जवळच असलेल्या ग्राम केळी येथिल नवदुर्गा उत्सव मंडळाचे वतीने नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित विविध सामाजिक उपक्रमाअंतर्गत अंधश्रद्धा निर्मुलनासह वैज्ञानिक दृष्टीकोन व जादुटोणा विरोधी कायदा विषयावरील चमत्कार प्रयोगांसह व्याख्यानात ते बोलत होते.          

व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रमूख अतिथी म्हणून स्थानिक जि.प. प्राथमिक शाळेचे शिक्षक प्रशांत देशमूख हे होते.तर प्रमुख वक्ते अखिल भारतिय अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीचे वक्ते निलेश रमेशराव मिसाळ, (शिक्षक, संत गाडगे महाराज प्राथमिक शाळा, मंगरूळपीर) हे होते.

Web Title: Science tells us ... ghost, baanamati, karani, stupa all lies! - Nilesh Mistle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.