रिसोड निवडणूक निकाल : चुरशीच्या लढतीत अमित झनकांची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 07:27 PM2019-10-24T19:27:31+5:302019-10-24T19:27:43+5:30

Risod Vidhan Sabha Election Results 2019: अमित झनक यांनी  अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख यांच्यावर निसटता विजय प्राप्त करीत विजयाची हॅट्रीक केली.

Risod Election Results 2019: Maharashtra vidhan sabha election Results 2019 : Amit Zanak beat Anant Deshmukh | रिसोड निवडणूक निकाल : चुरशीच्या लढतीत अमित झनकांची बाजी

रिसोड निवडणूक निकाल : चुरशीच्या लढतीत अमित झनकांची बाजी

googlenewsNext


- संतोष वानखडे  
वाशिम: रिसोड विधानसभा मतदारसंघात अतिशय चुरशीच्या झालेल्या दुरंगी लढतीत काँग्रेसचे उमेदवार अमित झनक यांनी  अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख यांच्यावर निसटता विजय प्राप्त करीत विजयाची हॅट्रीक केली.
रिसोड विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जातो. पूर्वीपासूनच या मतदारसंघात झनक घराण्याचे सर्वाधिक वर्चस्व राहिले आहे. दोन टर्मचा अपवाद वगळता काँग्रेस उमेदवार निवडून आले आहेत. सन २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसकडून आमदार अमित झनक  तर काँग्रेस बंडखोर अपक्ष उमेदवार म्हणून माजी खासदार अनंतराव देशमुख, वंचित बहुजन आघाडीकडून दिलीप जाधव, शिवसेनेकडून विश्वनाथ सानप यांच्यासह एकूण १६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. सुरूवातीला चौरंगी वाटणारी ही लढत प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात दुरंगी झाली. ही लढत प्रामुख्याने अमित झनक आणि अनंतराव देशमुख यांच्यात प्रतिष्ठेची म्हणून गणली गेली. 
२४ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजतापासून रिसोड येथे मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर सुरूवातीच्या चार, पाच फेºयांमध्ये अमित झनक यांना तिसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले. सहाव्या फेरीपर्यंत  दुसºया क्रमांकावर असलेले दिलीप जाधव त्यानंतर तिसºया क्रमांकावर फेकल्या गेले आणि अमित झनक लढतीत आले. 
शेवटच्या फेरीपर्यंत अत्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या या लढतीत अमित झनक यांनी अनंतराव देशमुख यांच्यावर  मात करीत तिसºयांदा विजय प्राप्त केला. पश्चिम वºहाडात काँग्रेसचे बालेकिल्ले ढासळत असताना झनक यांनी निसटता विजय मिळवित काँग्रेसचा गड कायम राखण्यात विजय मिळविला. शेवटपर्यंत देशमुख यांनी निकराची झुंज दिली. मात्र, शेवटच्या फेरीत त्यांना दुसºया क्रमांकावरच समाधान मानावे लागले.

Web Title: Risod Election Results 2019: Maharashtra vidhan sabha election Results 2019 : Amit Zanak beat Anant Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.