‘झिरो पेन्डंसी’बाबत बांधकाम विभागाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 02:06 PM2017-10-17T14:06:52+5:302017-10-17T14:07:06+5:30

‘झिरो पेन्डंसी’बाबत जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने सर्व कर्मचाºयांचा मॅरेथॉन आढावा घेतला असून, प्रलंबित प्रकरणे राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना कार्यकारी अभियंता व्ही.बी. गहेरवार यांनी मंगळवारी केल्या

Review of the construction department about 'Zero Penendi' | ‘झिरो पेन्डंसी’बाबत बांधकाम विभागाचा आढावा

‘झिरो पेन्डंसी’बाबत बांधकाम विभागाचा आढावा

Next
ठळक मुद्दे बांधकाम विभागाने घेतला सर्व कर्मचाºयांचा मॅरेथॉन आढावा

वाशिम - ‘झिरो पेन्डंसी’बाबत जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने सर्व कर्मचाºयांचा मॅरेथॉन आढावा घेतला असून, प्रलंबित प्रकरणे राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना कार्यकारी अभियंता व्ही.बी. गहेरवार यांनी मंगळवारी केल्या.

जिल्हा परिषद प्रशासनाने ‘झिरो पेन्डंसी व डेलि डिस्पोजल’ या उपक्रमांतर्गत प्रत्येक विभाग प्रमुखाने पूर्वीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे आणि यानंतर प्रलंबित प्रकरणे राहणार नाहीत, या दृष्टिकोनातून नियोजन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या सूचनांच्या अनुषंगाने बांधकाम विभागाने सोमवारी दुपारी ३ वाजतानंतर मॅरेथॉन आढावा घेऊन टेबलनिहाय प्रलंबित प्रकरणांची माहिती घेतले. यापूर्वीची सर्व प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी सर्व अभियंते व कर्मचाºयांनी आतापासूनच कामाला लागावे आणि यानंतर कोणतेही प्रकरण प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी अशा सूचना कार्यकारी अभियंता गहेरवार यांनी केल्या.

Web Title: Review of the construction department about 'Zero Penendi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.