रिसोड तालुक्यातील विविध शासकीय योजनांत कथित भ्रष्टाचाराची होणार चौकशी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 12:56 PM2018-08-14T12:56:03+5:302018-08-14T12:57:55+5:30

रिसोड: तालुक्यात शौचालय, घरकूल, रस्त्याची कामे, तसेच वृक्ष लागवडीसह विविध शासकीय योजनांत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार अन्याय व भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे जिल्हाध्यक्ष सुभाष कुटे यांनी केली आहे.

Report on alleged corruption in various government schemes in Risod taluka | रिसोड तालुक्यातील विविध शासकीय योजनांत कथित भ्रष्टाचाराची होणार चौकशी 

रिसोड तालुक्यातील विविध शासकीय योजनांत कथित भ्रष्टाचाराची होणार चौकशी 

googlenewsNext
ठळक मुद्दे शासकीय योजनांत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप अन्याय व भ्रष्टाचार निर्मुलन समितीने केला आहे.जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर करून चौकशी करून यातील दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली होती.संबंधितांकडून अहवाल मागविले जातील आणि त्यांचे निरीक्षण करून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.


लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड: तालुक्यात शौचालय, घरकूल, रस्त्याची कामे, तसेच वृक्ष लागवडीसह विविध शासकीय योजनांत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार अन्याय व भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे जिल्हाध्यक्ष सुभाष कुटे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेदन सादर करून १३ आॅगस्टपर्यंत चौकशी न केल्यास १४ आॅगस्टपासून समितीच्यावतीने उपोषणाचा इशारा दिला होता. याची दखल जिल्हाधिकाºयांनी घेत १० दिवसांत माहिती घेऊन चौकशीचे आश्वासन दिले आहे. 
रिसोड तालुक्यात घरकूल योजना, रस्त्यांची कामे, वृक्ष लागवड, एलईडी दिवे, रोहयो, शौचालयांसारख्या शासकीय योजनांत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप अन्याय व भ्रष्टाचार निर्मुलन समितीने केला आहे. एकच व्यक्तीला शौचालय अनुदानाचा वेळोवेळी लाभ देणे, शौचालय बांधलेल्या लाभार्थींना या योजनेची रक्कम न मिळणे, पात्र व्यक्तींना घरकुल योजनेपासून वंचित ठेवणे, रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाची करणे, रोहयोच्या कामगारांना मजुरी न मिळणे, चुकीचे मस्टर सादर करण्याचे प्रकार घडल्याचे या समितीने म्हटले असून, या प्रकरणी समितीचे जिल्हाध्यक्ष सुभाष कुटे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर करून चौकशी करून यातील दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली होती. ही चौकशी १३ आॅगस्टपर्यंत १४ आॅगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला होता. या निवेदनावर सुभाष कुटे, महादेव पुरी, रत्नाबाई शिंदे, ज्ञानेश्वर जाधव, उद्धव बोडखे, विष्णू गिरी, पुरुषोत्तम गिरी, रमेश अवचार, माधवराव अवचार, पांडुरंग खरात, संभाजी नेव्हुल, प्रकाश घाटोळ, आबाराव दळवी, श्रीराम साबळे, गिरीधर देशमुख, माधव जाधव, विठोबा धनगर, सुरेश कांबळे, विष्णू चिभडे, कुसूमताई जाधव, भुजंगराव देशमुख, परमेश्वर बोरकर आदिंची स्वाक्षरी होती. जिल्हाधिकाºयांनी या निवेदनाचा विचार करून निवेदन सादर करणाºया सर्वांना १३ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावले आणि त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली. यावेळी सर्व विभागांतील कथित गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी संबंधितांकडून अहवाल मागविले जातील आणि त्यांचे निरीक्षण करून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी निवेदनकर्त्यांना दिले आहे.

Web Title: Report on alleged corruption in various government schemes in Risod taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.