अंतिम यादी प्रकाशनापूर्वी मतदार यादीचे वाचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 04:22 PM2018-12-18T16:22:02+5:302018-12-18T16:22:12+5:30

वाशिम:  मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी जिल्ह्यात मतदार यादीचे वाचन करण्यात येत आहे.

Reading list of voters before publishing final list | अंतिम यादी प्रकाशनापूर्वी मतदार यादीचे वाचन

अंतिम यादी प्रकाशनापूर्वी मतदार यादीचे वाचन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम:  मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी जिल्ह्यात मतदार यादीचे वाचन करण्यात येत आहे. बीएलओमार्फत ही प्रक्रिया राबविण्यात येत असून, या अंतर्गत दुरुस्तीसाठी आवश्यक नोंदी त्यांच्याकडून घेण्यात येत आहेत.
निवडणूक आयोगाच्या निदेर्शाप्रमाणे १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यात १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत मतदार नोंदणीची मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे, मतदारांच्या नावात बदल, पत्त्यात दुरुस्ती, स्थलांतरासंबंधी मतदारांकडून नमुना अर्ज भरून घेणे तसेच मयत मतदारांची नावे यादीतून वगळण्याचे काम करण्यात आले. जिल्ह्यातील वाशिम - मंगरुळपीर, रिसोड -मालेगाव आणि कारंजा -मानोरा या तिन्ही विधानसभा मतदारसंघात १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत ३७ हजार ८५५ नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. नवीन मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी संबंधित मतदारांकडून अर्ज स्वीकारण्यात आले. आता अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्याची तयारी करण्यात येत असून, या अंतर्गत मतदार यादीचे वाचन जिल्हाभरात करण्यात येत आहे. विविध ग्रामपंचायत कार्यालयांतही मतदार यादीचे वाचन ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात येत असून, या प्रक्रियेदरम्यान मतदारांकडून पत्ता, नाव, छायाचित्रातील चुकांसह इतर बदलाच्या नोंदी बीएलओमार्फत घेण्यात येत आहेत. दरम्यान, विशेष पुनरिक्षण मोहिमेदरम्यान नव्याने नोंदणी झालेल्या मतदारांनंतर जिल्ह्यातील मतदारांची संख्या ९३८२०२ झाली असून, येत्या ११ डिसेंबर रोजी जिल्ह्याची अंतिम यादी प्रकाशित होणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकाºयांकडून देण्यात आली आहे.

Web Title: Reading list of voters before publishing final list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम