रेशन दुकानदारांना बँक व्यावसायिक प्रतिनिधी बनविण्याचा प्रश्न अधांतरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 03:00 PM2018-02-22T15:00:46+5:302018-02-22T15:02:22+5:30

वाशिम : राज्यभरातील रेशन दुकानदारांना बँकांचे अधिकृत व्यावसायिक प्रतिनिधी बनविण्याचा निर्णय शासनाने डिसेंबर २०१६ मध्ये घेतला होता. मात्र, ठोस अंमलबजावणी न झाल्याने १४ महिने उलटूनही हा प्रश्न अद्याप अधांतरीच रखडलेला आहे.

Ration shoppers to become correspondents of the bank desicion stalled | रेशन दुकानदारांना बँक व्यावसायिक प्रतिनिधी बनविण्याचा प्रश्न अधांतरी!

रेशन दुकानदारांना बँक व्यावसायिक प्रतिनिधी बनविण्याचा प्रश्न अधांतरी!

googlenewsNext
ठळक मुद्दे रेशन दुकानदारांना बँकांचे अधिकृत व्यावसायिक प्रतिनिधी बनविण्याचा निर्णय शासनाने डिसेंबर २०१६ मध्ये घेतला होता. कमी रकमेच्या कर्जाची वसुली करणे, स्वयंसहाय्यता बचत गटांना चालना देणे आदी १२ प्रकारच्या बँक सेवा पुरवायच्या, असे शासनाने ठरविले होते.मात्र, या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणीच झाली नाही. 


वाशिम : राज्यभरातील रेशन दुकानदारांना बँकांचे अधिकृत व्यावसायिक प्रतिनिधी बनविण्याचा निर्णय शासनाने डिसेंबर २०१६ मध्ये घेतला होता. मात्र, ठोस अंमलबजावणी न झाल्याने १४ महिने उलटूनही हा प्रश्न अद्याप अधांतरीच रखडलेला आहे.
रेशन दुकानदारांनी व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून काम करताना बचतीबाबत समाजात जनजागृती करणे, छोट्या स्वरूपातील ठेवी जमा करणे, कमी रकमेचे कर्ज वाटप करणे, कर्ज मागणीच्या अर्जातील मुळ माहितीची व आकडेवारीची पडताळणी करणे, कर्ज मागणी अर्ज जमा करणे, कमी रकमेच्या कर्जाची वसुली करणे, स्वयंसहाय्यता बचत गटांना चालना देणे आदी १२ प्रकारच्या बँक सेवा पुरवायच्या, असे शासनाने ठरविले होते. दरम्यान, बँकेच्या विविध सेवा स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत गावपातळीवर उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याने गावागावातील नागरिकांची सोय होणार होती. मात्र, या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणीच झाली नाही. 

वाशिम जिल्ह्यात ४१९ रेशन दुकानदार होते इच्छुक!
वाशिम जिल्ह्यात एकंदरित ८५० रेशन दुकानदार आहेत. त्यापैकी ४१९ दुकानदार व किरकोळ केरोसीन विक्रेत्यांनी बँकांचे व्यावसायिक प्रतिनिधी बनण्यासाठी सहमती दर्शविली होती. तसे संमतीपत्रही त्यांनी जिल्हा पुरवठा विभागाकडे सादर केले होते. प्रत्यक्षात मात्र शासनाने यासंदर्भात ठोस कार्यवाही न केल्याने १४ महिन्यातही विशेष काही होऊ शकले नाही.

Web Title: Ration shoppers to become correspondents of the bank desicion stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.