तूरीच्या बाजारभावात घसरण सुरूच; हमीभावापेक्षा १८०० रुपये कमी दर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 05:42 PM2018-06-05T17:42:15+5:302018-06-05T17:42:15+5:30

वाशिम : तूरीच्या बाजारभावात  प्रचंड प्रमाणात घसरण सुरू असून, सध्या तूरीला प्रति क्विंटल ३४०० ते ३८२५ रुपये या दरम्यान भाव मिळत आहे. यामुळे शेतकºयांची आर्थिक पिळवणूक होत असून, हमीभावापेक्षा तब्बल १७०० ते १८०० रुपये कमी दर मिळत आहे.

rate slash in market; 1800 rupees less than guaranteed | तूरीच्या बाजारभावात घसरण सुरूच; हमीभावापेक्षा १८०० रुपये कमी दर 

तूरीच्या बाजारभावात घसरण सुरूच; हमीभावापेक्षा १८०० रुपये कमी दर 

Next
ठळक मुद्देशेतकºयांची आर्थिक लूट होऊ नये म्हणून केंद्र सरकारने तूरीला किमान आधारभूत किंमत प्रती क्विंटल ५ हजार ४५० रुपये निश्चित केली आहे. मीभाव खरेदी केंद्राला मुदतवाढ मिळाली नसल्याने शेतकºयांना मातीमोल भावात तूरीची  विक्री करण्याची वेळ आली. ५ जून रोजी वाशिम बाजार समितीत तूरीची आवक १९०० क्विंटल अशी होती तर तूरीला प्रती क्विंटल ३४०० ते ३८२५ रुपये या दरम्यान दर होता.

 

वाशिम : तूरीच्या बाजारभावात  प्रचंड प्रमाणात घसरण सुरू असून, सध्या तूरीला प्रति क्विंटल ३४०० ते ३८२५ रुपये या दरम्यान भाव मिळत आहे. यामुळे शेतकºयांची आर्थिक पिळवणूक होत असून, हमीभावापेक्षा तब्बल १७०० ते १८०० रुपये कमी दर मिळत आहे.

गतवर्षी शेतकºयांना विविध अडचणींचा सामना करावा लागला. पुरेशा प्रमाणात पाऊस नसल्याने तूरीच्या उत्पादनात घट आली होती. शेतकºयांची आर्थिक लूट होऊ नये म्हणून केंद्र सरकारने तूरीला किमान आधारभूत किंमत प्रती क्विंटल ५ हजार ४५० रुपये निश्चित केली आहे. मात्र, बाजार समितीमध्ये तूरीला हमीभाव मिळत नसल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आहेत. अद्याप हमीभाव खरेदी केंद्राला मुदतवाढ मिळाली नसल्याने शेतकºयांना मातीमोल भावात तूरीची  विक्री करण्याची वेळ आली. २० दिवसांपूर्वी तूरीला प्रती क्विंटल ४००० ते ४२५० रुपये असा भाव होता. आता हमीभाव खरेदी केंद्रे बंद असल्याने बाजार समितीमध्ये तूरीला ३८०० रुपयाच्या आत भाव मिळत आहेत. मंगळवार, ५ जून रोजी वाशिम बाजार समितीत तूरीची आवक १९०० क्विंटल अशी होती तर तूरीला प्रती क्विंटल ३४०० ते ३८२५ रुपये या दरम्यान दर होता.गत २० दिवसांपासून बाजार समित्यांमध्ये तूरीची आवक कमी-अधिक प्रमाणात राहत असताना, बाजारभावात घसरण सुरू असल्याचे दिसून येते. वातावरणात वेळोवेळी झालेल्या विपरित बदलांमुळे या पिकाला अगोदरच जबर फटका बसला. आता खरिप हंगामात पेरणीसाठी खते, बियाण्यांची खरेदी करण्यासाठी शेतकºयांना मातीमोल भावाने तूरीची विक्री करावी लागत आहे. हमीभावानुसार खरेदी न करणाºयांविरूद् कारवाई करावी, अशी मागणी शेतकºयांनी मंगळवारी केली.

Web Title: rate slash in market; 1800 rupees less than guaranteed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.