मोलमजुरी करुन गाठले ‘राजश्री’ने उद्दिष्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 04:43 PM2019-05-11T16:43:14+5:302019-05-11T16:43:47+5:30

कुटुंबात कोणीही उच्चशिक्षीत नसताना, घरची हलाकीची परिस्थितीतही मोलमजुरी करुन एमपीएससी परिक्षेत राज्यात एसटी मुलीमधून तिसºया क्रमांकावर येवून करसंग्राहक म्हणून वर्णी लावली.

Rajshri aims to achieve the goal! | मोलमजुरी करुन गाठले ‘राजश्री’ने उद्दिष्ट!

मोलमजुरी करुन गाठले ‘राजश्री’ने उद्दिष्ट!

Next

- नंदलाल पवार 
मंगरुळपीर  :    मनुष्याच्या अंगी जिद्द , चिकाटी असल्यास त्याला कितीही अडचणी आल्यास , तसे वातावरणही नसले तरी तो आपले उद्दिष्ट गाठल्याशिवाय राहत नाही. असाच काहीसा प्रकार मंगरुळपीर तालुकयातील एका छोटयाश्या तीन हजार लोकवस्ती असलेल्या कोठारी गावातील राजश्री धोंगडे नामक मुलीने करुन दाखविला. कुटुंबात कोणीही उच्चशिक्षीत नसताना, घरची हलाकीची परिस्थितीतही मोलमजुरी करुन एमपीएससी परिक्षेत राज्यात एसटी मुलीमधून तिसºया क्रमांकावर येवून करसंग्राहक म्हणून वर्णी लावली. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतू होत आहे. 
राजश्रीचे  प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातील महात्मा ज्योतीबा फुले विद्यालय कोठारी येथे झाले . १२ वीचे शिक्षण गावापासून ५ किमी दूर असलेल्या जनता विद्यालय कवठळ येथे तीने पुर्ण केले.  पुढील शिक्षणासाठी खर्च करण्याची तयारी नसतांना मोलमजुरी केली.  कारण वडिलांकडे जेमतेम ३ एकर शेती त्यात घरात ४,५ भावंड . घरची आर्थीक परिस्थीती अत्यंत बिकट असतांना तीने  मुक्त विद्यापिठातून पदवीपर्यंत शिक्षण घेतले.  नंतर कुठल्याही मोठया शहरात स्पर्धा परिक्षेचा क्लास न लावता शेतात काम करून ती घरीच स्पर्धा परिक्षेची तयारी करू लागली . जिद्द चिकाटी व परिश्रम करण्याची तिची वृत्ती असल्याने पहिल्याच स्पर्धा परिक्षेत तिने यश संपादन करून पोस्ट खात्यात लिपीक पदावर निवड झाली , ऐवढयावरच समाधान  न मानता पुन्हा तीने स्पर्धा परिक्षा दिल्या त्यात तिला यश मिळाले.  मुंबई येथे मंत्रालयात कनिष्ठ लिपीक पदावर तीची निवड झाली तरीही  तीने पुन्हा स्पर्धा परिक्षा दिली . २०१९ च्या महाराष्टÑ लोकसेवा आयोग एमपीएससी परिक्षेत तीने एसटी मुलीमधून राज्यात तिसºया क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला व कर सहाय्यक पदावर तिची निवड झाली.
 
राजश्रीच्या कुटुंबात कोणीही उच्चशिक्षित नाही
कुटूंबात कोणालाही उच्च शिक्षणचा गंध नाही.  वडीलाचे शिक्षण ४ थी पर्यंत तर आई अशिक्षीत .  शेतीतून मिळणाºया तुटपुंज्या उत्पन्नावर तर कधी मोलमजुरी करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करत जिद्द व चिकाटीने राजश्रीने यश संपादन केले. घरी  जेमतेम ३ एकर शेती. तीन बहीणी २ भाउ  अशा अत्यंत बिकट परिस्थीतीतून तिने यश संपादन केले. घरात कोणीही उच्चशिक्षीत नाही. तरी सुध्दा शिक्षणाची आवड निर्माण करुन राजश्रीने आपले भवितव्य घडविले. जिवनात उदिष्ट ठेवल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नसल्याचे राजश्रीचे मत आहे.
- राजश्रीच्या यशाचे कौतूक व सत्कार 
 महाराष्टÑ लोकसेवा आयोग एमपीएससी परिक्षेत एसटी मुलीमधून राज्यात तिसººया क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवत  कर सहाय्यक पदावरनिवड होणाºया राजश्रीचे यशाचे कौतुक गावातील सर्व स्तरातून होत आहे.  महात्मा  ज्योतीबा फुले विद्यालय कोठारी च्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी तीचा सत्कार केला. राज्यात नावलौकीक केल्याबद्दल तीचे सर्वत्र कौतूक होत आहे.

Web Title: Rajshri aims to achieve the goal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.