वर्षावास कार्यक्रमाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 08:04 PM2017-10-09T20:04:41+5:302017-10-09T20:06:03+5:30

मेडशी : येथील कपिलवस्तू बुद्ध विहारात वर्षावास निमित्ताने बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ वाचन समारोप कार्यक्रम संपन्न झाला . वषार्वासात ३ महिने येथील बुद्ध विहारात बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे वाचन करण्यात आले .

Rainforest Program concludes | वर्षावास कार्यक्रमाचा समारोप

वर्षावास कार्यक्रमाचा समारोप

Next
ठळक मुद्देतीन महिने ग्रंथ पठण मान्यवरांचे मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
मेडशी : येथील कपिलवस्तू बुद्ध विहारात वर्षावास निमित्ताने बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ वाचन समारोप कार्यक्रम संपन्न झाला . वषार्वासात ३ महिने येथील बुद्ध विहारात बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे वाचन करण्यात आले .  वषार्वास समारोप  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारिप बहुजन महासंघाचे जेष्ठ नेते जे. एस. शिंदे , उपनिबधक  रमेश कटके , हंसराज शेंडे , , युनुस भाई खान , वाघ महाराज , रमेश तायडे ,आठवले यांची उपस्थिती होती.  कार्यक्रमाला  भारिप बहुजन महासंघ जिल्हा निरीक्षक एस बी खंडारे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संस्कार प्रमुख   हरिश्चंद्र पोफळे  , भारतीय बौद्ध महासभाचे चंद्रसुभाष   जाभरुणकर,   वाशिम  तालुका अध्यक्ष  जिल्हा राजेश शिवराम तायडे , मालेगाव भारतीय बौद्ध महा सभा तालुका अध्यक्ष दीपक वानखडे , विनोद तायडे ,भारिप बहुजन महासंघाचे विजय मनवर, बाळू खंडारे, समता सैनिक दलाचे मेजर अश्विनी खिल्लारे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. सुरवातीला पंचशील ध्वजारोहण जे एस शिंदे व दिनेश तायडे यांचे हस्ते करण्यात आले .तथागत गौतम बुद्ध ,महात्मा ज्योतिराव फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते हारार्पण आणि पुष्प अर्पण करण्यात आले  बौद्ध बांधवानी याप्रसंगी पंचशील ग्रहण केले. जे एस शिंदे यांनी वषार्वास आणि बौद्ध धम्मा विषयी माहिती विशद केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समता सैनिक दलाचे अध्यक्ष महेश तायडे यांची पूर्ण टीम  ,  भीमगर्जना ग्रुपचे अध्यक्ष वैभव तायडे यांची पूर्ण टीम व गरंथ पठन महिला मंडळ लंकाबाई चोटमल ,गयाबाई तायडे ,बेर्बी तायड,े सिंधु  तायड,े सोना तायडे, शांता तायड,े शीला  तायडे, लक्ष्मी तायड,े रंभा तायडे , विजय सोनूने , मिस्त्री  व पूर्ण बुद्ध उपासक व उपासिका यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Rainforest Program concludes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.