वाशीम येथे कलापथकाद्वारे  विविध सामाजिक विषयावर जनजागृती  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 01:04 PM2018-01-23T13:04:58+5:302018-01-23T13:06:10+5:30

वाशीम : मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाव्दारा व्दारा  तालुक्यातील टो येथे सामाजीक विषयावर जनजागृती शिबीर आयोजीत करण्यात आले होते.

Public awareness on various social issues by the artistic program at Washim | वाशीम येथे कलापथकाद्वारे  विविध सामाजिक विषयावर जनजागृती  

वाशीम येथे कलापथकाद्वारे  विविध सामाजिक विषयावर जनजागृती  

Next
ठळक मुद्दे राष्ट्रीय सेवा योजना पथकाव्दारा व्दारा  तालुक्यातील टो येथे सामाजीक विषयावर जनजागृती शिबीर आयोजीत करण्यात आले होते. शिबीरात शाहीर संतोष खडसे समता संदेश सांस्कृतीक कलापथक मंडळ उमरा यांच्या कलापथकाचा कार्यक्रम घेण्यात आला. कलापथक कार्यक्रमात ग्रामस्वच्छता, व्यसनमुक्ती, मुलगी वाचवा, अंधश्रध्दा निर्मुलन, महिला सक्षमीकरण, पर्यावरण इत्यादी विषयावर जनजागृती करण्यात आली.

वाशीम : मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाव्दारा व्दारा  तालुक्यातील टो येथे सामाजीक विषयावर जनजागृती शिबीर आयोजीत करण्यात आले होते. या शिबीरात शाहीर संतोष खडसे समता संदेश सांस्कृतीक कलापथक मंडळ उमरा यांच्या कलापथकाचा कार्यक्रम घेण्यात आला.     सुरुवातीला महाविद्यालयाच्यावतीने कलावंतांचा सन्मान करण्यात आला. नंतर भारतमातेचे वंदनगीत सादर करण्यात आले. कलापथक कार्यक्रमात ग्रामस्वच्छता, व्यसनमुक्ती, मुलगी वाचवा, अंधश्रध्दा निर्मुलन, महिला सक्षमीकरण, पर्यावरण इत्यादी विषयावर जनजागृती करण्यात आली. यामध्ये ‘आता एैका धनी, बेत ठरला मनी, चला पाया आता खोदु या दारी, शौचालय बांधुया’ ही लावणी शाहीर खडसे यांनी सादर केली. तर ‘दारु पिणं तुझं हे बरं नाही राव, सुधर बाबुराव आता सुधर बाबुराव’ हे व्यसनमुक्तीवरील गित शाहीर जनार्धन भालेराव यांनी सादर केले. या कलापथकामध्ये व्यसनमुक्ती पुरस्कारप्राप्त शाहीर संतोष खडसे, शाहीर काशीराम खडसे, कवी गायक जनार्धन भालेराव, विनोदी कलावंत गजानन खडसे, स्त्री अभिनय अमोल वानखडे, साहेबराव पडघान, ढोलकीवादक समाधान भगत आदी कलावंतांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम अधिकारी दामोदर, तनपुरे, दमगीर सह रासेयो कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन तनपुरे यांनी केले.

Web Title: Public awareness on various social issues by the artistic program at Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम