मानोरा तहसील कार्यालयात  दिव्यांगांचे १५  जानेवरीला ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 01:17 PM2017-12-29T13:17:33+5:302017-12-29T13:19:18+5:30

मानोरा : दिव्यांग व्यक्तींना  शासकीय नियमाप्रमाणे योजनांचा लाभ देण्यात यावा यासह ईतर मागण्याकरिता १५ जानेवारी रोजी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या संदर्भात दिव्यांग सल्ला समितीच्यावतिने   तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.

The protest movement at the Manora Tehsil office on 15th January | मानोरा तहसील कार्यालयात  दिव्यांगांचे १५  जानेवरीला ठिय्या आंदोलन

मानोरा तहसील कार्यालयात  दिव्यांगांचे १५  जानेवरीला ठिय्या आंदोलन

Next
ठळक मुद्देविविध मागण्यासाठी दिव्यांग सेवा समितीच्यावतिने हे आंदोलन करण्यात येणार आहे. या संदर्भात दिव्यांग सल्ला समितीच्यावतिने   तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.१७  जानेवारीला कारंजा येथे ठिय्या आंदोलन करणार असल्याचे निवेदनात नमुद केले आहे.

 

मानोरा : दिव्यांग व्यक्तींना  शासकीय नियमाप्रमाणे योजनांचा लाभ देण्यात यावा यासह ईतर मागण्याकरिता १५ जानेवारी रोजी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या संदर्भात दिव्यांग सल्ला समितीच्यावतिने   तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.

 दिव्यांग सेवा समितीमार्फत तहसीलदार डॉ.सुनिल चव्हाण यांना निवेदन देवुन शासकीय स्तरावर दिव्यांगाकरिता विविध योजना आहेत. मात्र याची अंमलबजावणी केल्या जात नाही.  तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत नगर पंचायत , नगर परिषद मधील अपंगाकरिता राखीव असलेला ३ टक्के निधीचा त्वरित लाभ देण्यात यावा , अपंग विधवा अनाथ भूमिहीन परितक्त्या  घटस्फोटीत वुध्द निराधार यांना शासन नियमाप्रमाणे  अंत्योदय, रास्त  योजनेत समाविष्ट करण्यात यावे, एस.सी. एस,टी.प्रमाणे घरकुल योजनेत समाविष्ट करुन घ्यावे, अपंगांना  घर टॅक्समध्ये ५० टक्के सवलत द्यावी,  लघु व्यवसाय करण्याकरिता २०० चौरस फुट जागा देण्यात यावी, तालुका आरोग्य उपकेंद्रातुन  अपंगाना आॅनलाईन  अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यात यावे, स्वराज्य  संस्थेतील ग्रामसेवकांनी अपंगाची नोंद केलेल्या गाव निहाय यादीची सत्य प्रत देण्यात यावी यासह विविध मागण्यासाठी दिव्यांग सेवा समितीच्यावतिने हे आंदोलन करण्यात येणार आहे. १५  जानेवरीला मानोरा तहसील कार्यालय तर १७  जानेवारीला कारंजा येथे ठिय्या आंदोलन करणार असल्याचे निवेदनात नमुद केले आहे. दिव्यांग सेवा समितीचे संस्थापक मोबीसिंग राठोड, जय चव्हाण, सुभाष इंगोले, भारत पाटील, प्रशांत डहाके यांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहे.  निवेदनाच्या  प्रती गटविकास अधिकारी, ठाणेदार मानोरा व समाज कल्याण अधिकारी वाशिम यांना देण्यात आल्या.

Web Title: The protest movement at the Manora Tehsil office on 15th January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.