युवकांमध्ये सकारात्मक दृष्टी आवश्यक - प्रा.हरिभाऊ क्षीरसागर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 04:57 PM2019-07-13T16:57:55+5:302019-07-13T16:58:03+5:30

 ‘अशक्य हा मज शब्द न माहीत, प्रयत्नची माझा देव, या देवाचे पूजन करिता नित्य येतसे चेव’ या कवितेप्रमाणे कार्य केले तर कोणतीच बाब अवघड नाही. युवकांमध्ये सकारात्मक दृष्टी निर्माण होणे आवश्यक आहे.

Positive vision is necessary for youth - Prof. Haribhau Kshirsagar | युवकांमध्ये सकारात्मक दृष्टी आवश्यक - प्रा.हरिभाऊ क्षीरसागर 

युवकांमध्ये सकारात्मक दृष्टी आवश्यक - प्रा.हरिभाऊ क्षीरसागर 

Next

वाशिम  : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा.हरिभाऊ क्षीरसागर हे गांधीवादी म्हणुन ओळखले जातात. एस.एम.सी. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, गोरक्षणाचे कार्याध्यक्ष, सर्वोदयाचे जिल्हाध्यक्ष, विदर्भ साहित्य संघाचे शाखाध्यक्ष अशा विविध भूमिका ते पार पाडत आहेत. त्यांच्याशी साधलेला संवाद...

- समाजसेवेची आवड आपल्याला कशी निर्माण झाली ?
 विद्यार्थी दशेत असतांना गो.से. महाविद्यालय वर्धा येथे डॉ. ठाकुरदासजी बंग यांच्या मार्गदर्शनामुळे समाजोपयोगी कार्याची ओळख झाली. त्यातुनच पू. विनोदबाजी भावे यांचाही सहवास लाभला. तव्दतच राजस्थान आर्य महाविद्यालयात नोकरीवर असताना नापुर विद्यापिठाचे माजी कुलगुुरु दादासाहेब काळमेघ यांच्याकडून समाजसेवेचा वसा मिळाला.

- आपल्या विविध उपक्रमाबद्दल थोडक्यात माहिती सांगा ?
सन १९७२ ला एस.एम.सी. शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करुन, समाजातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणुन वाशिमची पहिली इंग्रजी शाळा सुरु केली. नागपुर आणि अमरावती विद्यापिठाचा रासेयो समन्वयक म्हणुन विदर्भभर विविध उपक्रम राबवता आले. दिलीप गोरे रामकृष्ण सेवा समितीच्या माध्यमातुन मागील १५ वर्षापासुन गोरक्षणाचे कार्य सुरु आहे. सवंगडयांसमवेत, मोक्षधामाचे काम करतो. विदर्भ साहित्य संघाचा शाखाध्यक्ष म्हणुन विविध साहित्य विषयक उपक्रम वर्षभर चालु असतात. मी गांधीवादी असल्याने सर्वोदय मंडळामार्फत गांधी विचार समाजात पेरण्याचे कार्य करतो. गांधीजीची दीडशेवी जयंती रचनात्मक, उपक्रमांनी जिल्हयात यावर्षी साजरी करायची आहे. सर्व सेवा संघाने भुदान यज्ञ मंडळावर नियुक्ती केली आहे.

- तुम्ही सुरु केलेल्या ‘हरि’ व्याख्यानमालेबद्दल काय सांगाल ?
समाज प्रबोधनाच्या हेतुने सेवानिवृत्तीनंतर भविष्य निर्वाह निधीतून हरि व्याख्यानमाला सुरु केली आहे. पुढील वर्षी हरी व्याख्यानमालेला आता वीस वर्ष पूर्ण होतील. आतापर्यंत महाराष्ट्रातील सुपरिचीत व्याख्याते येथे येऊन गेले आहेत. य व्याख्यानमालेला प्रतिष्ठा लाभत असुन श्रोते तिची दरवर्षी वाट पाहतात.

- आजच्या तरुण पिढीला कोणता संदेश द्याल ?
 ‘अशक्य हा मज शब्द न माहीत, प्रयत्नची माझा देव, या देवाचे पूजन करिता नित्य येतसे चेव’ या कवितेप्रमाणे कार्य केले तर कोणतीच बाब अवघड नाही. युवकांमध्ये सकारात्मक दृष्टी निर्माण होणे आवश्यक आहे. आज युवकांमध्ये नकारात्मक वाढीस लागली असुन रड्या लोकांची संख्या वाढत आहे. युवकांनी यापासुन अलिप्त असावे, असे वाटते.ाा शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना

Web Title: Positive vision is necessary for youth - Prof. Haribhau Kshirsagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.