रिसोड येथे सुजलाम, सुफलाम अंतर्गत तलावातील गाळ उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 04:48 PM2019-03-03T16:48:09+5:302019-03-03T16:48:16+5:30

रिसोड (वाशिम) : राज्यशासन आणि भारतीय जैन संघटनेच्यावतीने (बीजेएस) राबविण्यात येत असलेल्या सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत रिसोड शहरालगत पिंगलाक्षी देवी संस्थान जवळ असलेल्या तलावातील गाळ उपशाच्या कामाला ३ मार्च रोजी प्रारंभ करण्यात आला.

pond suction under Sujalam, Suffalam at Risod | रिसोड येथे सुजलाम, सुफलाम अंतर्गत तलावातील गाळ उपसा

रिसोड येथे सुजलाम, सुफलाम अंतर्गत तलावातील गाळ उपसा

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क 
रिसोड (वाशिम) : राज्यशासन आणि भारतीय जैन संघटनेच्यावतीने (बीजेएस) राबविण्यात येत असलेल्या सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत रिसोड शहरालगत पिंगलाक्षी देवी संस्थान जवळ असलेल्या तलावातील गाळ उपशाच्या कामाला ३ मार्च रोजी प्रारंभ करण्यात आला. रिसोडचे तहसीलदार आर. यू. सुरडकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 
सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत जिल्हाभरात सीसीटी, डीपसीसीटी, सिमेंट नाला बांध खोलीकरण, नाला खोलीकरण, नदी खोलीकरण, ढाळीचे बांध आणि साठवण तळ्यांची कामे करण्यात येत आहेत. आता या अभियानांतर्गत जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या प्राचीन आणि बुजत चाललेल्या जलस्त्रोतातील गाळाचा उपसा करून खोली वाढविण्याचे काम होणार आहे. सर्वप्रथम रिसोड तालुक्यात हे काम हाती घेण्यात आले असून, निजामपूर ग्रामपंचायतच्या पुढाकारातून पिंगलाक्षी देवी मंदिराजवळील तलावातील गाळ उपशाला रविवारी प्रारंभ करण्यात आला. या तलावातून निघालेला गाळ शेतकºयांना मोफत देण्यात येत असून, पहिल्याच दिवशी ४० शेतकºयांनी या तलावातील गाळ शेतात टाकण्यासाठी नेला. शेतकºयांनी केवळ ट्रॅक्टर आणून हा गाळ घेऊन जावा, असे आवाहन तहसीलदार सुरडकर आणि निजामपूरच्या सरपंचांंनी केले आहे. या तलावाच्या खोलीकरणामुळे रिसोड शहरासह, कंकरवाडी, निजामपूर या गावांतील भुजल पातळी वाढणार आहे. या कामाच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार आर.यू. सुरडकर, निजामपुरचे सरपंच डिगांबर जाधव, नगरसेवक पवन छित्तरका, अ‍ॅड.कृष्णा आसनकर, सुभाष चोपडे, माजी नगर सेवक सतिश इरतकर, दिपक वर्मा, विष्णू कदम, बीजेएस रिसोडचे अध्यक्ष बाहुबली सराफ, उपाध्यक्ष संजय काळे, किशोरकुमार महाजन, सुरेश काळे, अनिल धोतरकर, विनोद पंचवाटकर, संदीप कुरकुटे, निलेश महाजन, राहुल मेण यांची उपास्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अविनाश सोनूने आदिंची उपस्थिती होती. या तलावातून निघालेला गाळ शेतकºयांना मोफत देण्यात येत असून, पहिल्याच दिवशी ४० शेतकºयांनी या तलावातील गाळ शेतात टाकण्यासाठी नेला. शेतकºयांनी केवळ ट्रॅक्टर आणून हा गाळ घेऊन जावा, असे आवाहन तहसीलदार सुरडकर आणि निजामपूरच्या सरपंचांंनी केले आहे.

Web Title: pond suction under Sujalam, Suffalam at Risod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.