पाच कोटींच्या योजनेचे पाणी दुषित: व्हॉल्वमध्ये गटाराचे पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 06:09 PM2019-03-26T18:09:07+5:302019-03-26T18:10:00+5:30

शिरपूर जैन (वाशिम): येथील पाणीटंचाईची समस्या कायमस्वरुपी दूर करण्यासाठी ७ वर्षांपूर्वी पाच कोटींची रुपयाची राष्ट्रीय पेयजल योजना कार्यान्वित करण्यात आली खरी; परंतु या योजनेतील जलवाहिनीचा व्हॉल्व गटारानजिकच असल्याने त्यात घाणपाणी घुसत असल्याने पिण्याचे पाणी दुषित होत आहे.

Polluted water in shirpur jain: Drainage water in the valve | पाच कोटींच्या योजनेचे पाणी दुषित: व्हॉल्वमध्ये गटाराचे पाणी 

पाच कोटींच्या योजनेचे पाणी दुषित: व्हॉल्वमध्ये गटाराचे पाणी 

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम): येथील पाणीटंचाईची समस्या कायमस्वरुपी दूर करण्यासाठी ७ वर्षांपूर्वी पाच कोटींची रुपयाची राष्ट्रीय पेयजल योजना कार्यान्वित करण्यात आली खरी; परंतु या योजनेतील जलवाहिनीचा व्हॉल्व गटारानजिकच असल्याने त्यात घाणपाणी घुसत असल्याने पिण्याचे पाणी दुषित होत आहे.
मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथे २०१२ पर्यंत अपुºया व्यवस्थेमुळे ग्रामस्थांना सतत पाणीटंचाईच्या समस्येचा सामना करावा लागत असे. गावात पाणीपुरवठा करणाºया नळयोजनेची जलवाहिनी अडोळ प्रकल्प ते शिरपूरपर्यंत एकेरीच होती. त्यामुळे समस्येत अधिकच भर पडली होती. ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य ईमदाद बागवान यांनी जिल्हा परिषदेकडे पाठपुरवठा करून राष्ट्रीय पेयजल योजना अंतर्गत पाच कोटीचा निधी मंजूर करून घेतला. या निधीतून अडोळ प्रकल्प ते शिरपूर जैन अशी जवळपास दहा किलोमीटर अंतराची नवी जलवाहिनी टाकण्यात आली. गावातही बºयाच ठिकाणी नवीन जलवाहिनी बसविण्यात आली. गावकºयांसाठी उपयुक्त असलेल्या या योजनेचे काम सुरू असतानाच बरेच आरोप-प्रत्यारोप झाले. कामाच्या तक्रारी झाल्या, उपोषणे झाली आणि त्याची चौकशीही झाली. हे काम बरेच दिवस चालले. या काळात तीन वेळा राष्ट्रीय पेयजल योजनेचे अध्यक्षही बदलण्यात आले. या योजनेवर जवळपास पाच कोटी रुपये खर्च झाले. त्यामुळे या योजनेतून गावकºयांची तहान भागविण्यासाठी शुद्ध पाणी मिळणे अपेक्षीत होते; परंतु ही अपेक्षा फलद्रूपच झाली नाही. सद्यस्थितीत अडोळ प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसाठा असल्याने तीन दिवसाला गावांमध्ये पाणीपुरवठा केला जात असला तरी हे पाणी पिण्यायोग्य नाही. या योजनेंतर्गत गावकºयांना पाणी पुरवठा करण्यासाठी जी जलवाहिनी बसविण्यात आली. त्या जलवाहिनीवरील बरेच व्हॉल्व लिक झाले आहेत. काही व्हॉल्वच्या लगतच गटार साचले असून, या गटाराचे पाणी व्हॉल्वमध्ये घुसते. त्यामुळे नळाद्वारे गावकºयांना दुषित पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे हे पाणी पिण्यायोग्य राहिले नसून, केवळ कपडे धुण्यासह इतर कामासाठीच त्याचा वापर करता येत आहे. त्यामुळे पुरेसा पाणी पुरवठा होत असतानाही दुषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात येण्याची भिती असल्याने बहुतांश लोक कॅनचे पाणी घेऊन आपली तहान भागवित आहेत. पाच कोटींच्या योजनेतून नळाद्वारे मिळणारे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही, सांगण्याची तसदी आरोग्य विभागाकडून घेण्यात येत नसल्याचे दिसते.

Web Title: Polluted water in shirpur jain: Drainage water in the valve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.