एस.टी.बसेसच्या नादुरूस्तीमुळे प्रवासी वैतागले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 02:52 PM2018-05-05T14:52:33+5:302018-05-05T14:52:33+5:30

शिरपूर जैन (वाशिम) : ‘महाराष्ट्राची लोकवाहिनी’ म्हणून ओळखल्या जाणाºया महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बहुतांश बसेसला सद्या नादुरूस्तीचे ग्रहण लागले आहे.

Passengers in problem due to st bus fail | एस.टी.बसेसच्या नादुरूस्तीमुळे प्रवासी वैतागले!

एस.टी.बसेसच्या नादुरूस्तीमुळे प्रवासी वैतागले!

googlenewsNext
ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बहुतांश बसेसला सद्या नादुरूस्तीचे ग्रहण लागले आहे. पैसे मोजून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एस.टी.च्या खाली उतरून धक्का मारावा लागत असल्याचा गंभीर प्रकार दिसून येत आहे. जुनाट झालेल्या अनेक बसेस जिल्ह्यातील रस्त्यांवर ‘फेल’ होवून बंद पडत आहेत.


शिरपूर जैन (वाशिम) : ‘महाराष्ट्राची लोकवाहिनी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बहुतांश बसेसला सद्या नादुरूस्तीचे ग्रहण लागले आहे. विशेषत: ग्रामीण भागात प्रवासादरम्यान मध्येच बस बंद पडत आहेत. अशावेळी पैसे मोजून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एस.टी.च्या खाली उतरून धक्का मारावा लागत असल्याचा गंभीर प्रकार दिसून येत आहे.
प्रवासी हे आमचे दैवत आहे, असे एस.टी. परिवहन महामंडळाची भूमिका आहे. मात्र, याच देवाला अनेकवेळा भर रस्त्यात बंद पडणाºया बसेसला धक्का द्यावा लागत असताना परिवहन महामंडळाचे त्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. जुनाट झालेल्या अनेक बसेस जिल्ह्यातील रस्त्यांवर ‘फेल’ होवून बंद पडत आहेत, रात्रभराच्या मुक्कामाला आगारात उभ्या राहणाऱ्या बसला सकाळच्या सुमारास धक्का द्यावा लागतो, त्याशिवाय बस सुरूच होत नाही, असा अनुभव प्रवाशांना येत आहे. एकूणच या सर्व कारणांमुळे प्रवाशांमध्ये परिवहन महामंडळाप्रती तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Web Title: Passengers in problem due to st bus fail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.