"स्वाधार योजने’साठी अर्ज करण्याला केवळ दोन दिवस शिल्लक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 08:00 PM2017-11-13T20:00:48+5:302017-11-13T20:07:20+5:30

शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांकरीता शासनाने सुरू केलेल्या ‘स्वाधार' योजनेत सहभागी होण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक असून, पात्र विद्यार्थ्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत समाज कल्याण कार्यालयात अर्ज सादर करावे, असे आवाहन समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

Only two days left to apply for 'Swadhar Yojana'! | "स्वाधार योजने’साठी अर्ज करण्याला केवळ दोन दिवस शिल्लक!

"स्वाधार योजने’साठी अर्ज करण्याला केवळ दोन दिवस शिल्लक!

Next
ठळक मुद्देनिवास व भोजन भत्ता मिळणार अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश 

लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम : शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनूसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासनाने ‘स्वाधार योजना’ अंमलात आणली  आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक असून, पात्र विद्यार्थ्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत समाज कल्याण कार्यालयात अर्ज सादर करावे, असे आवाहन समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त माया केदार यांनी १३ नोव्हेंबर रोजी केले.
शासकीय महाविद्यालयांची संख्या व तेथे प्रवेश घेणाºया मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात शासकीय वसतीगृहांची सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध नाही. शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनादेखील शिक्षणासाठी अर्थसहाय्य देण्याच्या उद्देशातून डॉ. बाबासाहेब आंबेडर स्वाधार योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत अनुसूचित जाती प्रवर्गातील शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेला विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे. भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी ती रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही वार्षिक रक्कम असणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याला इयत्ता १० वी, १२ वी, पदवी व पदविका परीक्षेमध्ये किमान ६०  टक्के गुण असणे आवश्यक आहे. याच प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणांची अट ५० टक्के आहे. 
विद्यार्थी जर मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे, ठाणे, नागपूर याठिकाणी शिक्षण घेत असेल, तर एकूण भत्ता ६० हजार रुपये विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात टाकण्यात येणार आहेत. महसूल विभागीय शहर, क वर्ग महानगरपालिका शहर यामध्ये शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना एकूण ५१ हजार रुपये आणि उर्वरित ठिकाणी उच्च शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांसाठी एकूण ४३ हजार रुपये मिळणार आहे. या रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष ५ हजार रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष २ हजार रुपये रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी देण्यात येणार आहे. वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी १५ नोव्हेंबर २०१७ पर्यंत समाज कल्याण कार्यालयात अर्ज सादर करावे, असे आवाहन केदार यांनी केले.

Web Title: Only two days left to apply for 'Swadhar Yojana'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.