३३ गावांतील रुग्णांसाठी एकच वैद्यकीय अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 02:27 PM2018-06-18T14:27:06+5:302018-06-18T14:27:06+5:30

मालेगाव: केवळ एकच वैद्यकीय अधिकारी गेल्या दोन महिन्यांपासून शिरपूर जैन परिसरातील ३३ गावांतील ५० हजारांहून अधिक रुग्णांच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळत आहेत.

Only one medical officer at shirpur PHC | ३३ गावांतील रुग्णांसाठी एकच वैद्यकीय अधिकारी

३३ गावांतील रुग्णांसाठी एकच वैद्यकीय अधिकारी

googlenewsNext
ठळक मुद्देशिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन महिन्यांपासून वैद्यकीय अधिकारी म्हणून केवळ डॉ. श्रीकांत करवते, हेच कार्यरत आहेत. या ठिकाणी किमान दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असणे गरजेचे आहे.

 
मालेगाव: केवळ एकच वैद्यकीय अधिकारी गेल्या दोन महिन्यांपासून शिरपूर जैन परिसरातील ३३ गावांतील ५० हजारांहून अधिक रुग्णांच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळत आहेत. शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रांत वैद्यकीय अधिकाºयांची पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागांतील गोरगरीब रुग्णांची गैरसोय होत आहे. 
शिरपूर जैन येथील रात्रंदिवस सेवा देण्याची सोय असलेल्या शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन महिन्यांपासून वैद्यकीय अधिकारी म्हणून केवळ डॉ. श्रीकांत करवते, हेच कार्यरत आहेत. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया ५९ गावांत कुठेही काही घटना घडल्यास जखमी व्यक्तींची तपासणी करण्याचे काम शिरपूर आरोग्य केंद्रातच पार पाडले जाते. ही बाब लक्षात घेता. या ठिकाणी किमान दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असणे गरजेचे आहे. यामुळे परिसरातील ३३ गावांतील रुग्णांना समाधानकारक आरोग्य सेवा उपलब्ध होतील आणि कार्यरत वैद्यकीय अधिकाºयांचा ताणही कमी होईल. तथापि, या  ठिकाणी आवश्यक वैद्यकीय अधिकाºयांची पदे रिक्त असून, केवळ डॉ. श्रीकांत करवतेच या आरोग्य केंद्रांतर्गत येणाºया ३३ गावांसह शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया गावांतील जखमी व्यक्तींची तपासणी करण्याची जबाबदारी पार पाडत आहेत.

Web Title: Only one medical officer at shirpur PHC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.