अपघातात एक ठार; एक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 10:33 PM2017-10-22T22:33:42+5:302017-10-22T22:34:24+5:30

शिरपूर जैन : अमरावतीवरुन परतूरकडे जाणारी बस आणि विरूद्ध दिशेने येणाºया दुचाकीमध्ये जबर अपघात होऊन एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना चांडस येथे २२ आॅक्टोंबरला दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. सत्यप्रकाश रमेश कंकाळ रा. मरसुळ जि.अकोला असे मृतकाचे नाव आहे. 

One killed in accident; One seriously injured | अपघातात एक ठार; एक गंभीर जखमी

अपघातात एक ठार; एक गंभीर जखमी

Next
ठळक मुद्देचांडस फाट्यानजीकची घटना अकोला जिल्ह्यातील मृतक

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन : अमरावतीवरुन परतूरकडे जाणारी बस आणि विरूद्ध दिशेने येणाºया दुचाकीमध्ये जबर अपघात होऊन एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना चांडस येथे २२ आॅक्टोंबरला दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. सत्यप्रकाश रमेश कंकाळ रा. मरसुळ जि.अकोला असे मृतकाचे नाव आहे. 
शिरपूर पोलिस स्टेशनच्या हददीत येणाºया औरंगाबाद-नागपूर दु्रतगती मार्गावरून रविवारी एम.एच.२० बीएल १७०८ ही राज्य परिवहन मंडळाची बस अमरावतीवरुन परतूरकडे जात होती. यावेळी मेहकरकडून येणाºया दुचाकीस्वाराने समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता, चांडस गावानजीक सदर दुचाकीची बसला जबर धडक लागली. या अपघातात दुचाकी वाहन पूर्णपणे बसच्या खाली घुसले होते. यामध्ये दुचाकीस्वार सत्यप्रकाश रमेश कंकाळ रा. मरसूळ जि.अकोला हा जागीच ठार तर ज्ञानेश्वर राठोड रा. मरसूळ ता. पातूर हा गंभीर जखमी झाला. जखमीला शिरपूर पोलिसांनी १०८ रुग्णवाहिकेव्दारे उपचारासाठी वाशिम येथे पाठविले. दुचाकीस्वाराने कानात ईअर फोन लावलेला असल्याचे पोलिस व प्रत्यक्षदर्शीनंी सांगितले. या अपघातात बस पूर्णपणे रस्त्याच्या कडे उतरली होती. सुदैवाने बसमधील कुणालाही इजा झाली नाही. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक शिपणे, पोहेकाँ माणिकराव खानझोडे, पो.काँ. रमेश मोरे यांनी घटनास्थळावर धाव घेतली. घटनेचा पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.

Web Title: One killed in accident; One seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात