वनोजा ते माळशेलू रस्त्यावर अपघातात दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 03:29 PM2018-12-11T15:29:47+5:302018-12-11T15:30:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मंगरुळपीर  : आॅटो-दुचाकी अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना १० डिसेंबरच्या रात्री साडे आठ वाजता तालुक्यातील वनोजा ...

one killed in an accident | वनोजा ते माळशेलू रस्त्यावर अपघातात दुचाकीस्वार ठार

वनोजा ते माळशेलू रस्त्यावर अपघातात दुचाकीस्वार ठार

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर  : आॅटो-दुचाकी अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना १० डिसेंबरच्या रात्री साडे आठ वाजता तालुक्यातील वनोजा ते माळशेलू रस्त्यावर घडली .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी कळनु बारकू घोडे (६५) रा . जनुना यांनी तक्रार दिली की, फिर्यादीचा २२ वर्षिय मुलगा आकाश कळनू घोडे हा १० डिसेंबरच्या रात्री जनुना येथून शेलुबाजार येथे मोटर सायकल क्र .एम .एच . ३० एन ८३३६ ने जात होता. यावेळी आॅटो क्रं. एम .एच. २९ डब्ल्यू ९४४० चा आॅटोचालकाने भरधाव वेगाने दुचाकीस धडक मारली. यात आकाशचा मृत्यू झाला. अशा तक्रारीवरून पोलिसांनी आॅटो चालकाविरुद्ध कलम २७९,२३७,३०४ अ व मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: one killed in an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.