अधिकारी, कर्मचार्‍यांसह पदाधिकार्‍यांनी केली स्वच्छता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 01:15 AM2017-09-21T01:15:07+5:302017-09-21T01:16:33+5:30

वाशिम: केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व नागरी व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये  १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता हीच सेवा हे विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यानुसार वाशिम नगर परिषदेच्यावतीने यासंदर्भात जनजागृती करून स्वत: अधिकारी व कर्मचारी यांनी हातात झाडू घेऊन शहरातील विविध भागातील स्वच्छता केली. विशेष म्हणजे या उपक्रमात नगराध्यक्षासह पदाधिकारी सहभागी झाले होते.

Officials, employees and employees cleanliness! | अधिकारी, कर्मचार्‍यांसह पदाधिकार्‍यांनी केली स्वच्छता!

अधिकारी, कर्मचार्‍यांसह पदाधिकार्‍यांनी केली स्वच्छता!

googlenewsNext
ठळक मुद्देवाशिम नगर परिषद मुख्याधिकारी, अध्यक्षांनी हाती घेतले झाडू!

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व नागरी व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये  १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता हीच सेवा हे विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यानुसार वाशिम नगर परिषदेच्यावतीने यासंदर्भात जनजागृती करून स्वत: अधिकारी व कर्मचारी यांनी हातात झाडू घेऊन शहरातील विविध भागातील स्वच्छता केली. विशेष म्हणजे या उपक्रमात नगराध्यक्षासह पदाधिकारी सहभागी झाले होते.
या अभियानादरम्यान शासकीय कार्यालये, रेल्वे स्टेशन, बस डेपो इ. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्याचे नियोजित आहे. या अनुषंगाने वाशिम नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे, नगराध्यक्ष अशोक हेडा यांच्यासह पदाधिकार्‍यांनी रेल्वेस्थानक परिसर, कृषी उत्पन्न बाजार समितीसह विविध भागातील स्वच्छता करून नागरिकांनी स्वच्छता पाळण्याचे आवाहन केले आहे. 
विविध पद्धतीने जनजागृती उपक्रम राबवून जिल्हा स्वच्छ बनविण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले होते. 
याबाबत मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन करून शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे आवाहन नागरिकांना यावेळी केले. 
तसेच आपला परिसर कसा स्वच्छ ठेवता येईल, याबाबतसुद्धा मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याधिकारी गणेश शेटे, नगराध्यक्ष अशोक हेडा, सभापती राहुल तुपसांडे, उमेश मोहळे, बाजार समितीचे सदस्य हिराभाई जानीवाले,  राजूभाऊ जानीवाले, अभियंता विनय देशमुख,  कनिष्ठ अभियंता राजेश घुगरे, स्वच्छता विभागाचे जितू बढेल,  काष्टे, राजेश महाले,  संतोष किरळकर, नागापुरे, यांच्यासह स्वच्छता विभागातील कर्मचारी, नगर परिषदेचे पदाधिकारी व बाजार समितीमधील सदस्यांची उपस्थिती लाभली होती.

 १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ हे विशेष जनजागृती अभियानांतर्गत शहरात विविध भागांची स्वच्छता करून जनजागृतीचे कार्य हाती घेण्यात आले आहे.
- गणेश शेटे
न.प. मुख्याधिकारी, वाशिम

शहर स्वच्छतेला आपण सुरुवातीपासूनच महत्त्व दिले आहे. त्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविणार असलेले ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान आले. यामुळे आपला उद्देश सफल झाला. यासाठी सर्व जण तन-मन-धनाने काम करणार आहेत.
- अशोक हेडा, नगराध्यक्ष

Web Title: Officials, employees and employees cleanliness!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.