नाफेडच्या खरेदीपासून दोन तालुके वंचितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 04:13 PM2017-10-27T16:13:42+5:302017-10-27T16:14:53+5:30

वाशिम: जिल्ह्यात अनेकांच्या पाठपुराव्यानंतर अखेर गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील वाशिम, मंगरुळपीर, रिसोड आणि कारंजा या ठिकाणी नाफेडकडून उडिद, मुगाची खरेदी सुरू करण्यात आली; परंतु अद्यापही मानोरा आणि मालेगाव तालुक्यात या खरेदीला मुहूर्त मिळाला नाही.

No Nafed purchase in two talukas of washim | नाफेडच्या खरेदीपासून दोन तालुके वंचितच

नाफेडच्या खरेदीपासून दोन तालुके वंचितच

Next
ठळक मुद्देशेतकºयांत असंतोष लोकप्रतिनिधींच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

वाशिम: जिल्ह्यात अनेकांच्या पाठपुराव्यानंतर अखेर गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील वाशिम, मंगरुळपीर, रिसोड आणि कारंजा या ठिकाणी नाफेडकडून उडिद, मुगाची खरेदी सुरू करण्यात आली; परंतु अद्यापही मानोरा आणि मालेगाव तालुक्यात या खरेदीला मुहूर्त मिळाला नाही. या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शेतकºयांनी केलेल्या मागणीला प्रशासनाचा प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळे शेतकºयांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.

जिल्ह्यात यंदा अल्प पावसामुळे उडिद, मुग या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यातच शासनाने या दोन पिकांसाठी अनुक्रमे ५४०० आणि ५५७६ असे हमीभाव शासनाने जाहीर केले आहेत; परंतु या शेतमालास बाजारात ४ हजार ते ४५०० रुपयांपर्यंतचेच भाव मिळत होते. त्यामुळे शेतकरी आणि लोकप्रतिनिधींकडून नाफेडची खरेदी सुरू करण्याची मागणी वारंवार करण्यात आली. त्याची दखल घेऊन दोन दिवसांपूर्वी वाशिम, मंगरुळपीर, कारंजा आणि रिेसोड येथे नाफे डची खरेदी सुरू करण्यात आली; परंतु मालेगाव आणि मानोरा येथे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांसह विविध स्तरावर निवेदन सादर करून या ठिकाणी नाफेडची खरेदी सुरू करण्याची मागणी केली तरी, त्याची दखल मात्र घेण्यात आली नाही. मालेगाव येथील शेतकºयांना रिसोड किं वा वाशिम येथे शेतमाल नेणे परवडणार नाही, तर मानोरा येथील शेतकºयांना कारंजा किंवा मंगरुळपीर येथे शेतमाल नेणे परवडणार नाही. मोठा खर्च करून मालाची वाहतूक करणे त्यासाठी हमाली देणे वाहनाची सोय करणे आणि खरेदी केंद्रावर लवकर मोजणी झाली नाही, तर मुक्काम करून वाहनाचे नाहक भाडे भरण्यासह इतर खर्च करणे किंवा स्थानिक बाजारात कमी भावाने माल विकणे, हे सारखेच ठरणार आहे. त्यामुळे प्रशासनाने मालेगाव आणि मानोरा येथेच शेतकºयांच्या सोयीसाठी नाफेडचे केंद्र सुरू करण्याची ूमागणी येथील लोकप्रतिनिधी आणि शेतकरी करीत आहेत. 

Web Title: No Nafed purchase in two talukas of washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.